मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आग: धुराचे लोट

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील नरिमन पॉईंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात आज (दि.२१) आग लागली. कार्यालयात डागडुजीचे काम सुरू असताना शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले जात आहे. यावेळी कार्यालयातून धुराचे लोट बाहेर येत होते. यात कोणी जखमी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. भाजप कार्यालयातील किचनमध्ये वेल्डिंगचे काम सुरू होते. यावेळी शॉर्टसर्किट होऊन आग लागली. आगीच्या घटनेनंतर …

मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आग: धुराचे लोट

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मुंबईतील नरिमन पॉईंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात आज (दि.२१) आग लागली. कार्यालयात डागडुजीचे काम सुरू असताना शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले जात आहे. यावेळी कार्यालयातून धुराचे लोट बाहेर येत होते. यात कोणी जखमी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.
भाजप कार्यालयातील किचनमध्ये वेल्डिंगचे काम सुरू होते. यावेळी शॉर्टसर्किट होऊन आग लागली. आगीच्या घटनेनंतर अग्निशमक दलाला तत्काळ पाचारण करण्यात आले. आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, आमदार प्रसाद लाड कार्यालयात दाखल झाले. लाड यांनी सांगितले की, कार्यालयात आग लागल्यानंतर अग्निशामक साहित्याचा वापर करण्यात आला. आग मुख्य कार्यालयाच्या मागील बाजूस लागल्याने कार्यालयातील साहित्याला आगीची झळ पोहोचलेली नाही.
नार्वेकर यांनी सांगितले की, आगीच्या घटनेवेळी १०० माणसे कार्यालयात होती. त्यांना तत्काळ बाहेर काढण्यात आले. अग्निशमक दल तत्काळ दाखल झाल्याने आग लवकर विझविण्यात यश आले. कोणत्याही व्यक्तीला दुखापत पोहोचलेली नाही.
हेही वाचा 

पुणेकर शिवसैनिक शिंदेंंच्या भेटीला; पोलिसांच्या कडक सुरक्षेत मुुंबईत दाखल
Lok Sabha Election 2024 उत्तर पश्चिम मुंबईत ‘महायुती’ चा उमेदवार अद्याप अनिश्चित
बाबासाहेबांचे पुत्र यशवंतराव आंबेडकरांचा पराभव