सत्ताबदलाच्या अंदाजामुळेच एलन मस्क यांचा भारत दौरा लांबणीवर

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : जगातील एक बडे उद्योगपती आणि टेस्ला कंपनीचे प्रमुख एलन मस्क यांनी आपला नियोजित भारत दौरा लांबणीवर टाकला आहे. आता ते निवडणूक झाल्यानंतर भारतात येणार आहेत. म्हणजे या निवडणुकीनंतर देशात सरकार बदलणार आहे, याचा अंदाज आल्यामुळेच एलन मस्क यांनी त्यांचा दौरा पुढे ढकलला आहे. फक्त देशातील जनतेलाच नाही, तर जगभरातील लोकांना मोदी …

सत्ताबदलाच्या अंदाजामुळेच एलन मस्क यांचा भारत दौरा लांबणीवर

मुंबई, Bharat Live News Media वृत्तसेवा : जगातील एक बडे उद्योगपती आणि टेस्ला कंपनीचे प्रमुख एलन मस्क यांनी आपला नियोजित भारत दौरा लांबणीवर टाकला आहे. आता ते निवडणूक झाल्यानंतर भारतात येणार आहेत. म्हणजे या निवडणुकीनंतर देशात सरकार बदलणार आहे, याचा अंदाज आल्यामुळेच एलन मस्क यांनी त्यांचा दौरा पुढे ढकलला आहे. फक्त देशातील जनतेलाच नाही, तर जगभरातील लोकांना मोदी पुन्हा येऊ शकत नाहीत, हे कळून चुकले आहे, असे माजी आमदार व काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात बोलताना गाडगीळ म्हणाले की, दुसऱ्या एखाद्या देशात मोठी आर्थिक गुंतवणूक करण्या-या आंतरराष्ट्रीय कंपन्या गुंतवणूक करण्यापूर्वी त्या देशातील आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करतात. काही कंपन्या तर सामाजिक परिस्थितीवरही लक्ष ठेवून असतात. या कंपन्यांच्या प्रमुखांच्या दौ-यांचे नियोजन कित्येक महिने अगोदरच केले जात असते. संबंधित देशात सत्तेवर कोणते सरकार असणार, हा एक कंपन्यांच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा असतो.
टेस्ला या प्रसिध्द कंपनीचे मालक एलन मस्क यांनी भारत दौरा आता लांबणीवर टाकला आहे. याचाच अर्थ भारतात निवडणुकानंतर सत्ता परिवर्तन होणार आहे, याचा त्यांना अंदाज आला आहे. देशातील जनतेलाही हा अंदाज आलेला आहे. कितीही ४०० पारच्या गप्पा मारल्या, तरी मोदी पुन्हा सत्तेवर येणार नाहीत. मोदी आणि भाजपचा पराभव निश्चित झालेला आहे, असे गाडगीळ म्हणाले.
हेही वाचा 

Lok Sabha Election 2024 | भुजबळांच्या माघारीनंतर ‘ओबीसी’ एकवटले
Chandrapur Lok Sabha Election: चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात 67.57 टक्के टक्के मतदान; खरी लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये
Lok Sabha Election 2024 – नागपूर ५४.११, रामटेक ६१ टक्के मतदान; कमी टक्का कुणाला धक्का!