माढा लोकसभा निवडणूक: मोडनिंब येथे शरद पवारांची तोफ धडाडणार

मोडनिंब : Bharat Live News Media वृत्तसेवा : माढा लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते- पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पहिली सभा मोडनिंब येथे बुधवारी (दि. २४) आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आली.
सध्या लोकसभेची रणधुमाळी माढा लोकसभा मतदारसंघात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मोडनिंब येथील मार्केट यार्डात शरद पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्याचे तसेच माढा लोकसभा मतदारसंघाचे लक्ष या सभेकडे लागून राहिले आहे. माढा तालुक्यातील महाविकास आघाडीतील नेतेमंडळी यांनी मोडनिंब येथे एकत्र येऊन पवार यांच्या सभेबद्दलची माहिती पत्रकारांना दिली.
संजय कोकाटे, शिवाजी कांबळे, अॅड. बाळासाहेब पाटील, हरिदास रणदिवे, भारत नाना पाटील, संजय पाटील- घाटणेकर या सर्वांनी मनोगत व्यक्त करून पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली. सयाजी पाटील, भालचंद्र पाटील, कुरण अण्णा गिड्डे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा
Loksabha election : माढा लोकसभा मतदारसंघात काका-पुतणे आमने-सामने?
Loksabha Election : काँग्रेस म्हणजे मूळ, शेंडा नसलेली वेल: पीएम मोदींचा परभणीत घणाघात
Lok Sabha Election 2024 : विदर्भाच्या बालेकिल्ल्यातून काँग्रेसची पीछेहाट का झाली?
