छत्तीसगड दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीची मोठी कारवाई, IAS अधिकाऱ्याला अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क: छत्तीसगडमधील (अंमलबजावणी संचालनालय) दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात निवृत्त आयएएस अधिकारी अनिल टुटेजा यांना अटक केली आहे. अधिकृत सूत्रांनी रविवारी ही माहिती दिली, या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (ED Arrested Retired IAS) छत्तीसगड दारू घोटाळा प्रकरणात ईडीने 2003 च्या बॅचच्या अधिकाऱ्याला शनिवारी रायपूर येथील आर्थिक गुन्हे शाखा …

छत्तीसगड दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीची मोठी कारवाई, IAS अधिकाऱ्याला अटक

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: छत्तीसगडमधील (अंमलबजावणी संचालनालय) दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात निवृत्त आयएएस अधिकारी अनिल टुटेजा यांना अटक केली आहे. अधिकृत सूत्रांनी रविवारी ही माहिती दिली, या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (ED Arrested Retired IAS)
छत्तीसगड दारू घोटाळा प्रकरणात ईडीने 2003 च्या बॅचच्या अधिकाऱ्याला शनिवारी रायपूर येथील आर्थिक गुन्हे शाखा (EOW)/लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो (ACB) कार्यालयातून ताब्यात घेतले होते. जिथे आयएएस अधिकारी आणि त्यांचा मुलगा यश टुटेजा याच प्रकरणात त्यांचे बयाण नोंदवण्यासाठी गेले होते. (ED Arrested Retired IAS)
संबंधित आयएएस अधिकाऱ्याला प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींनुसार ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान रिमांडची मागणी करणाऱ्या दंडाधिकाऱ्यासमोर हजर केले जाण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले. संबंधित अधिकारी गेल्या वर्षीच निवृत्त झाले होते. (ED Arrested Retired IAS)
ईडीने छत्तीसगडमध्ये विकल्या जाणाऱ्या दारूच्या प्रत्येक बाटलीतून बेकायदेशीरपणे पैसे गोळा केल्याचा आरोप केला होता आणि रायपूरच्या महापौरांचे मोठे बंधू अन्वर ढेबर यांच्या नेतृत्वाखालील दारू सिंडिकेटने निर्माण केलेल्या 2,000 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार आणि मनी लाँड्रिंगचे पुरावे सापडले होते.

Enforcement Directorate has arrested former IAS officer Anil Tuteja in a Prevention of Money Laundering case linked to an alleged liquor scam. The action was taken by the ED’s Chhattisgarh regional office. This case was taken over by the investigation agency recently: Sources
— ANI (@ANI) April 21, 2024