आचारसंहितेमुळे ‘निराधार’ योजनेच्या 240 प्रस्तावांना ब्रेक

पिंपळनेर, जि.धुळे  : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने ४ जूनपर्यंत आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे निराधारांना आधार देणाऱ्या विविध योजनांच्या २४० प्रस्तावांना ब्रेक लागला आहे. आता आचारसंहिता संपल्यानंतरच ही प्रकरणे निकाली लागतील. लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यामुळे श्रावण बाळ, संजय गांधी, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी दिव्यांग, इंदिरा गांधी विधवा, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य …
आचारसंहितेमुळे ‘निराधार’ योजनेच्या 240 प्रस्तावांना ब्रेक

पिंपळनेर, जि.धुळे  : Bharat Live News Media वृत्तसेवा
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने ४ जूनपर्यंत आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे निराधारांना आधार देणाऱ्या विविध योजनांच्या २४० प्रस्तावांना ब्रेक लागला आहे. आता आचारसंहिता संपल्यानंतरच ही प्रकरणे निकाली लागतील.
लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यामुळे श्रावण बाळ, संजय गांधी, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी दिव्यांग, इंदिरा गांधी विधवा, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे प्रस्ताव मंजुरीसाठी होणाऱ्या बैठका होऊ शकणार नाही. त्यामुळे आता ही प्रकरणे जुन महिन्यापर्यंत तरी निकाली निघणार नाही. सद्य:स्थितीत श्रावण बाळ योजनेंतर्गत ९१, संजय गांधी योजनेंतर्गत ८३, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेंतर्गत ५४, इंदिरा गांधी दिव्यांग योजनेंतर्गत १, राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेंतर्गत १२ प्रकरण प्रलंबित आहे.
आचारसंहितेनंतर निर्णय
आचारसंहिता संपल्यानंतर प्रलंबित प्रकरणांची छाननी होईल. तसेच एप्रिल ते जून या कालावधीत सर्व पात्र लाभार्थ्यांनी हयातीचा दाखला जमा करावा, अशी माहिती संजय गांधी योजनेचे तहसीलदार गोपाल पाटील यांनी दिली. त्यामुळे आता लाभार्थ्यांना प्रतिक्षा करावी  लागणार आहे.
जानेवारीत दिला प्रस्ताव
निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी जानेवारीत अर्ज दाखल केला आहे. आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने तीन ते चार महिने प्रस्ताव मंजूर होण्यासाठी वाट पाहावी लागेल. लक्ष्मीबाई जगताप यांनी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी जानेवारी महिन्यात अर्ज दाखल केला आहे. आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने तीन ते चार महिने प्रस्ताव मंजूर होण्यासाठी त्यांना प्रतिक्षा करावी लागणार आहे.
हेही वाचा:

मृतदेहाच्या अवस्थेवरून मृत्यूची अचूक वेळ सांगणारा किडा सापडला!
स्वाधारसाठी नवीन ‘व्हीपीडीए’ प्रणाली
प्रत्येक क्षण देशसेवेची गॅरंटी