आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल. मेष: तुमच्या कार्यक्षमतेमुळेअनेक कामे योग्य प्रकारे पूर्ण करू शकाल, असे श्रीगणेश सांगतात; पण कोणताही निर्णय घेताना भावनेच्‍या आहारी …

आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

चिराग दारूवाला :

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
मेष: तुमच्या कार्यक्षमतेमुळेअनेक कामे योग्य प्रकारे पूर्ण करू शकाल, असे श्रीगणेश सांगतात; पण कोणताही निर्णय घेताना भावनेच्‍या आहारी न जाता व्यावहारिकपणे निर्णय घ्या, त्याचे चांगले परिणाम होतील. जोखमीच्या कामात तुम्हाला विशेष फायदा होणार आहे. अफवांवर लक्ष देऊ नका. एखाद्याच्या गैरसमजामुळे मित्रांसोबतचे संबंध खराब हेावू शकतात. रागावर नियंत्रण ठेवा. व्यावसायिक कार्यात केलेल्या योजनांचे चांगले परिणाम मिळतील.
वृषभ : आज कौटुंबिक आणि आर्थिक संबंधित महत्त्वाचे निर्णय घेतल्यास सकारात्मक परिणाम मिळू शकतात. आवडीसाठी थोडा वेळ दिल्‍यास आध्यात्मिक आनंद मिळू शकतो. निर्णय घेण्यात जास्त वेळ घालवू नका अन्यथा यश तुमच्या हातातून निसटून जाईल, अशी सूचना श्रीगणेश करतात. नातेवाईकांबरोबर एखाद्या गोष्टीबाबत गैरसमज निर्माण होऊ शकतो. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
मिथुन : काही काळापासून सुरू असलेल्या कौटुंबिक समस्यावर तोडगा काढण्‍यासाठी प्रयत्‍नशील असाल, आज एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीची भेट झाल्‍याने स्वतःमध्ये नवीन ऊर्जा जाणवेल. महत्त्‍वाच्‍या वस्‍तू हरविणे किंवा चोरीला जाण्‍याची शक्‍यता आहे, सजग राहा. मुलांना कोणताही निर्णय घेताना तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. यातून त्‍यांच्‍यामध्‍ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. व्यावसायिक कामात गाफील राहू नका, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.
कर्क : आजचा दिवस स्वप्ने पूर्ण करण्याचा दिवस आहे. इतरांच्या सल्ल्याऐवजी स्‍वत:वर विश्‍वास ठेवून कृती करा, असे श्रीगणेश सांगतात. आर्थिक प्राप्‍ती चांगली होईल मात्र खर्चही अधिक असू शकतो. कुटुंबासह व्यवसायात बाहेरील व्यक्तीला ढवळाढवळ करू देऊ नका. व्यावसायिक ठिकाणी केलेल्या मेहनतीचे योग्य फळ न मिळाल्याने मनात थोडी चिंता राहील.
सिंह : श्रीगणेश म्हणतात की, धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यक्रमातील सहभाग तुमचे विचार सकारात्मक आणि संतुलित राहतील. आर्थिक बाबतीत यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील.ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी अनुकूल असू शकते. मित्रांमध्ये व्यस्त राहून वेळ वाया घालवू नका. अतिआत्मविश्वासामुळे नुकसान होवू शकते. सासरच्या लोकांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा.
कन्या : विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत चांगले निकाल मिळतील. आज एक स्वप्न पूर्ण होणार आहे, म्हणून मेहनत करा. ग्रहस्थिती तुमच्यासाठी अनेक शुभ संधी घेऊन येत आहे. कोणत्याही कारणाने काम टाळण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे अनेक कामांना विलंब होऊ शकतो. बोलण्‍यावर नियंत्रण ठेवा. व्यवसायाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे कामात पूर्ण सहकार्य राहील, असे श्रीगणेश सांगतात.
तूळ : आज वडिलधाऱ्यांचा आशीर्वाद आणि पाठिंबा राहील, असे श्रीगणेश सांगतात. मुलांकडून सुरू असलेल्या कोणत्याही समस्येवर उपाय शोधून काढल्याने मन:शांतीही मिळू शकते. वैयक्तिक कामांवर योग्य लक्ष केंद्रित करणे फायदेशीर ठरेल. राग आणि घाई या दोषांवर नियंत्रण ठेवा. अन्‍यथा ही बाब तुमच्या कुटुंबासाठी त्रासदायक ठरू शकते. खर्चावर नियंत्रण ठेवा. कर्मचाऱ्यांना अपेक्षित यश मिळेल.
वृश्चिक : आज कामाचे ताण जास्‍त असेल. आराम आणि मौजमजेकडे दुर्लक्ष करुन कामावर लक्ष केंद्रित करा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. घरामध्ये नवीन सजावटीसाठी काही योजना असतंल. कुटुंबातील सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण राहिल. मात्र कोणतेही काम करताना निष्काळजी राहू नका. इतरांच्या चर्चेत न अडकता तुमच्या निर्णयाला प्राधान्य द्या. कार्यक्षेत्रात जास्त काम होऊ शकते. पती-पत्नीने नात्यातील गैरसमज वाढू देवू नयेत.
धनु : आज तुमची कामे नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करा, अशी सूचना श्रीगणेश देतात. तुमचा संपर्क वाढवा. तुम्हाला यश मिळू शकेल. मालमत्तेशी संबंधित कामे मनाप्रमाणेहोतील. आळशीपणा टाळा. नकारात्मक बोलण्यामुळे जवळच्‍या नातेवाईकांशी संबंध बिघडण्‍याची शक्‍यता.
मकर : श्रीगणेश सांगतात की, तुम्ही काही काळापासून जी कामे करण्याचा प्रयत्न करत आहात ती पूर्ण होण्याची वेळ आली आहे. तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला योग्य फळ मिळेल. महत्त्‍वाची कागदपत्रे सांभाळा. मार्केटिंगशी संबंधित कामे आणि संपर्क मजबूत करण्यासाठी आज तुमचा वेळ लागेल.
कुंभ : श्रीगणेश म्‍हणतात की, विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या ऊर्जेचा पुरेपूर वापर करा. दुपारची स्थिती अधिक लाभदायक होत आहे. केलेल्या मेहनतीचे नजीकच्या भविष्यात चांगले फळ मिळू शकते. जास्त चर्चा करण्यात वेळ घालवू नका. आपल्या योजना त्वरित सुरू करा. खर्च जास्त होईल. मात्र उत्पन्नाची स्थिती समाधानकारक असल्‍याने अडचण येणार नाही.
मीन : दिवसाच्या सुरुवातीला तुमच्या महत्त्वाच्या कामाची योजना करा. दुपारनंतर परिस्थिती अतिशय अनुकूल असल्याने तुमचे काम व्यवस्थित पार पडेल, असे श्रीगणेश म्‍हणतात. आळशीपणा टाळा. यामुळे काही यश हातातून निसटू शकते. घरातील वडीलधाऱ्यांनाही तुमच्या देखरेखीची गरज आहे. त्यामुळे त्यांची काळजी घ्या. कार्यक्षेत्रातील सामानाशी संबंधित कोणत्याही समस्येमुळे नुकसान होऊ शकते.