कन्याकुमारी ते बारामुल्ला रेल्वे प्रकल्प ऑगस्टमध्ये पूर्ण होणार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने पुढील १०० दिवसांचा आपला विकास कार्यक्रम निश्चित केला आहे. रेल्वे मंत्रालयातर्फे याकाळात कन्याकुमारी ते बारामुल्ला जोडणारा रेल्वेलाईन प्रकल्प येत्या ऑगस्टपर्यंत पूर्ण केला जाणार आहे. या प्रकल्पात कटरा ते ​बनिहालपर्यंत उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक योजना पूर्ण केली जाणार आहे. या योजनेत स्वालकोट येथे डोंगर खोदून …

कन्याकुमारी ते बारामुल्ला रेल्वे प्रकल्प ऑगस्टमध्ये पूर्ण होणार

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने पुढील १०० दिवसांचा आपला विकास कार्यक्रम निश्चित केला आहे. रेल्वे मंत्रालयातर्फे याकाळात कन्याकुमारी ते बारामुल्ला जोडणारा रेल्वेलाईन प्रकल्प येत्या ऑगस्टपर्यंत पूर्ण केला जाणार आहे.

या प्रकल्पात कटरा ते ​बनिहालपर्यंत उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक योजना पूर्ण केली जाणार आहे. या योजनेत स्वालकोट येथे डोंगर खोदून बोगदा बनविण्याचे काम कोंकण रेल्वेचे इंजीनियर करीत असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक योजनेंतर्गत कटरा ते बनिहाल अंतर जोडले जाणार आहे. चिनाब नदीवर उड्डाणपूल बांधण्याचे कामही  अंतिम टप्प्यात आहे. हा उड्डाणपूल कटरा ते बनिहाल अशा १११ किमी अंतराच्या रस्त्याला जोडणार आहे.

उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक योजनेचे काम पूर्ण होताच प्रवाशी कन्याकुमारीपर्यंत रेल्वेने प्रवास करू शकतील, असेही सूत्रांनी सांगितले.