सोलापूर : जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : शहर-जिल्ह्यात काही ठिकाणी शनिवारी (दि. 20) अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसापासून जिल्ह्यातील काही भागांत चांगला पाऊस पडल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात उन्हाचा कडाका वाढला होता. त्यामुळे सोलापूरकर उकाड्याने हैराण झाले होते. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांत पावसाने हजेरी लावल्यामुळे तापमानात …

सोलापूर : जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले

सोलापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : शहर-जिल्ह्यात काही ठिकाणी शनिवारी (दि. 20) अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसापासून जिल्ह्यातील काही भागांत चांगला पाऊस पडल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात उन्हाचा कडाका वाढला होता. त्यामुळे सोलापूरकर उकाड्याने हैराण झाले होते. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांत पावसाने हजेरी लावल्यामुळे तापमानात घट झाली आहे. 43.3 अंश सेल्सिअसवर गेलेल्या तापमानाचा पारा शनिवारी 39.6 अंशावर स्थिरावला. त्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
शनिवारी दुपारी अक्कलकोट तालुक्यात वादळी वार्‍यासह तुफान अवकाळी पाऊस पडला आहे. बासलेगाव ते गळोरगी रस्त्यावरील ओढ्याला मोठा पूर आल्याने रस्ता बंद पडला आहे. सलग तिसर्‍या दिवशी सोलापूर जिल्ह्यात वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस पडत आहे. सोलापूर शहर आणि परिसरात दुपारी सुरुवातीला
वादळी वार्‍याला सुरुवात झाली होती. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. उत्तर सोलापूर तालुक्यालाही अवकाळीचा फटका बसला आहे. जिल्ह्यातील बर्‍याच तालुक्यात अवकाळी पाऊस पडला आहे. त्यामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. गतवर्षी अल्प प्रमाणात पाऊस पडल्याने शेतकरी अडचणीत असताना ऐन उन्हाळ्यात जिल्ह्यातील काही भागात मोठा अवकाळी पाऊस पडल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.