रस्त्यावर पंक्चर काढणे बेतले चालकाच्या जीवावर, कंटेनरला टिप्परची धडक; चालक ठार

खानापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : पंक्चर झालेला टायर बदलण्यासाठी कंटेनरच्या बाजूला थांबलेल्या चालकाला पाठीमागून आलेल्या टिप्परने जोराची धडक दिल्याने चालक जागीच ठार झाला. रामनगर-धारवाड मार्गावरील तावरगट्टी जवळ आज (दि.20) सकाळी 8 च्या सुमारास अपघात घडला. शाहिद अब्दुलमिया अन्सारी (३७ रा. रामपूर, जि. हजारीबाग, झारखंड) असे मयत कंटेनर चालकाचे नाव आहे. याप्रकरणी टिप्पर चालक मंजुनाथ बसाप्पा नाशिपुडी (रा. येरीकोप्प ता. जि. धारवाड याच्यावर बेजबाबदारपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Kolhapur News)
गोव्याहून रामनगर मार्गे धारवाडच्या दिशेने जाणारा कंटेनर (क्र. केए 52 बी 0462) तावरगट्टी जवळील चेक पोस्टजवळ पंक्चर झाला. पंक्चर काढण्यासाठी रस्त्याच्या बाजूला कंटेनर थांबवून चालक टायर बदलण्याचे काम करत होता. यावेळी मागून आलेल्या टिप्परने (क्र. केए 25 एबी 2652) कंटेनरला जोराची धडक दिली. जॅक सुटल्याने चालक शाहिद कंटेनरखाली सापडून जागीच ठार झाला. या प्रकरणी खानापूर पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे.
हेही वाचा :
DC vs SRH : अबब…पॉवर प्लेमध्ये 125 धावा; हैदराबादने दिल्लीला धुतले
राजधानी दिल्लीत चुरशीच्या लढती, निवडणुकीच्या आखाड्यात बहुतांश चेहरे नवे
धाराशीव: उमरगा येथे अवकाळीचे थैमान; वीज कोसळून जनावरे दगावली, मुरूम येथे दोघे जखमी
