सूर्य कोपला: विदर्भ चाळीशीपार; नागरिक हैराण

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा:  आठवडाभरापूर्वी विदर्भात पडलेल्या अवकाळी पावसामुळे 30 ते 35 अंशावर आलेला तापमानाचा पारा आता चांगला चढला आहे. शनिवारी (दि.२०)  पूर्व विदर्भ 40 अंशाच्या पार गेला आहे. अकोला 44 तर चंद्रपूरचे तापमान 43.8 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. त्यामुळे पुन्हा नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील पाच जागांवर काल …

सूर्य कोपला: विदर्भ चाळीशीपार; नागरिक हैराण

चंद्रपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा:  आठवडाभरापूर्वी विदर्भात पडलेल्या अवकाळी पावसामुळे 30 ते 35 अंशावर आलेला तापमानाचा पारा आता चांगला चढला आहे. शनिवारी (दि.२०)  पूर्व विदर्भ 40 अंशाच्या पार गेला आहे. अकोला 44 तर चंद्रपूरचे तापमान 43.8 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. त्यामुळे पुन्हा नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे.
लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील पाच जागांवर काल शुक्रवारी मतदान पार पडले. 43 अंश सेल्सिअस तापमानामध्ये नागरिकांनी मतदान करण्यासाठी घराबाहेर पडुन आपला हक्क बजावला. रखरखत्या उन्हामुळे दुपारी एक ते पाच पर्यंत मतदानाला थंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर शेवटच्या तासात पूर्व विदर्भातील लोकसभा मतदारसंघातील मतदानाच्या आकडेवारी मध्ये वाढ झाली.
आठवडापूर्वी अवकाळी वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने वातावरण अचानक गारठले होते. परंतू आता सूर्यदेव कोपला आहे. सद्या राजकीय वातावरण आणी उन्हाचा पारा चांगलाच चढला आहे. रखरखत्या उन्हात अंगाची लाही लाही होत आहे. त्यामुळे दुपारचे तापलेल्या वातावरण नागरिक बाहेर निघणे टाळत आहेत. अशातच देशात पाच टप्यात लोकसभा निवडणूक होवू घातली आहे. काल शुक्रवारी पहिल्या टप्प्यातील पूर्व विदर्भातील पाच जागांसाठी मतदान पार पडले. त्यामध्ये वाढलेल्या तापमानाचा मतदानाला फटका बसला आहे.
काल पर्यंत 42, 43 अंशावर असलेले तापमान आज अचानक वाढले
पूर्व विदर्भातील अकरावी जिल्ह्यातील तापमानात प्रचंड वाढवून चाळीशीपार गेला आहे. सर्वात जास्त अकोला 44 44 अंशावरती पोहोचला असून सर्वात कमी तापमान बुलढाणा 40.6 अंशावर आहे. त्यापाठोपाठ चंद्रपूर 43.8 वर पोहचले आहे. वाशीम 43.6, ब्रम्हपुरी 43.1, अमरावती 42.8, यवतमाळ आणि वर्धा 42.5, गडचिरोली 41.8, नागपूर 41.5 तर गोंदियाचे तापमान 41.1 अंश सेल्सिअस वर पोहोचले आहे. कडक उन्हाचा सामना नागरीकांना करावा लागत आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिलला होत आहे. त्यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी आदी आठ मतदार संघाचा सामावेश आहे. वाढत्या तापमानाचा येथील मतदानावर परिणाम पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हेही वाचा 

Lok Sabha Election 2024 – नागपूर ५४.११, रामटेक ६१ टक्के मतदान; कमी टक्का कुणाला धक्का!
 नागपूर: बापरे..! मतदान केंद्रात निघाला साप
संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष; रामटेकमध्ये 2405 तर नागपूरमध्ये 2105 मतदान केंद्र