मुंबई: महालक्ष्मी मंदिरासमोर कारने २ मुलींना उडविले; थरकाप उडविणारा व्हिडिओ समोर

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील महालक्ष्मी मंदिरासमोरील रस्ता ओलांडताना एका बेदरकार गाडीने दोन लहान मुलींना उडविले. ही थरकाप उडविणारी घटना शनिवारी (दि.२०) सकाळी घडली. या दोन्ही जखमी मुलींना नायर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. ऐशानी जाधव ( वय १४) आणि जान्हवी कनोजिया (वय १४) अशी या जखमी मुलींची नावे आहेत. या …

मुंबई: महालक्ष्मी मंदिरासमोर कारने २ मुलींना उडविले; थरकाप उडविणारा व्हिडिओ समोर

मुंबई, Bharat Live News Media वृत्तसेवा : मुंबईतील महालक्ष्मी मंदिरासमोरील रस्ता ओलांडताना एका बेदरकार गाडीने दोन लहान मुलींना उडविले. ही थरकाप उडविणारी घटना शनिवारी (दि.२०) सकाळी घडली. या दोन्ही जखमी मुलींना नायर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
ऐशानी जाधव ( वय १४) आणि जान्हवी कनोजिया (वय १४) अशी या जखमी मुलींची नावे आहेत. या अपघाताची दखल बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा आणि शिवसेना प्रवक्त्या अॅ़ड. सुशीबेन शाह यांनी घेतली आहे. त्या आज सायंकाळी मुलींच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी तसेच या मुलींच्या पालकांची भेट घेण्यासाठी नायर हॉस्पिटल येथे जाणार आहेत.
हेही वाचा 

मुंबई : आंतरराज्यीय अंमलीपदार्थाचे रॅकेट उघड; नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई पथकाची कारवाई
Mumbai Police | गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई मुंबईत घातपात घडवणार! मुंबई पोलीस यंत्रणा अलर्टवर
Mumbai Lok Sabha Election : मुंबईत चार जागी तिढा; चित्र अस्पष्ट