विरोचकाला प्राप्त झालेली नवी शक्ती राजाध्यक्ष कुटुंबावर कोणतं नवीन संकट ओढवेल?

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेने नुकतेच आपले ५०० भाग पूर्ण केले, ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मालिकेत रोज नवीन ट्विस्ट आणि रहस्य उलगडताना दिसतायेत. या आठवड्यात आपण पाहिलं की, नेत्रा अस्तिकाचा वध करते. रुपाली बिथरते आणि ती अद्वैतवर हल्ला करते. त्याचवेळेस नेत्रा त्याच चाकूने रुपालीच्या गळ्यावर वार करते.
रुपाली मेली असं सर्वाना वाटत असतानाच ती उठून बसते आणि विरोचक अमर असल्याचं सर्वांना सांगते. पण रुपालीला दक्षिण दिशेकडे जाण्याचे संकेत मिळताहेत आणि एका वाद्याच्या आवाजाने रुपालीला भंडावून सोडलंय. त्या वाटेवर जात असतानाच रुपालीच्या हाती विरोचकाकडून एका वाद्याची खूण मिळते जे वाद्य ‘विचित्र वीणा’ आहे.
विचित्र वीणाच्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत रुपाली वादन करताना तिच्या हातातून खूप रक्त येत. या वादनातून रुपालीला नवी शक्ती प्राप्त झालेय. आता प्राप्त झालेली ही शक्ती राजाध्यक्ष कुटुंबावर कोणतं नवीन संकट ओढवेल ? काय असेल विरोचकाची नवी चाल? ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ दररोज रात्री १०.३० वा. झी मराठीवर पाहता येईल.
