बीड: उमापूर- शेवगाव रस्त्यावरील अपघातात सख्ख्या भावाचा मृत्यू; एक जण गंभीर

गेवराई: Bharat Live News Media वृत्तसेवा: उमापूर- शेवगाव रोडवर पिकअप व दुचाकीचा झालेल्या अपघातात सख्ख्या भावापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी एकाला उपचारासाठी संभाजीनगरला हलविले. हा अपघात आज (दि.२०) गेवराई तालुक्यातील माऊली फाट्यावर झाला.
मासे वाहतूक करणारा पिकअप व दुचाकीचा गेवराई तालुक्यातील माऊली फाट्यावर अपघात झाला. यात उमापूर येथील रहिवासी दादासाहेब सांगुळे यांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी उमापूर येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आला. तर एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला संभाजीनगर येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे.
हेही वाचा
बीड : परळी रेल्वे स्थानकावर लिफ्टमध्ये अडकले प्रवासी
बीड : परळी वैजनाथमध्ये देशी गावठी कट्टयासह दोन जिवंत काडतुस जप्त !
बीड : आध्यत्मिक गुरु वासुदेवराव खंदारे गुरुजी यांचे निधन, नव्वदव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
