राज्यातील दोन कोटी मुलांची आरोग्य तपासणी..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मुलांच्या आरोग्याचे संवर्धन आणि विकास साधण्यासाठी राबविण्यात येणार्‍या राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील 0 ते 18 वर्षे वयोगटातील जवळपास 2 कोटी मुलांना लाभ होत आहे. कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र राज्य अग्रेसर ठरले आहे. आरबीएसके कार्यक्रमांतर्गत अंगणवाडीस्तरावर 2023 ते मार्च 2024 या कालावधीत 0 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांची दोनवेळा तपासणी करण्यात …

राज्यातील दोन कोटी मुलांची आरोग्य तपासणी..

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : मुलांच्या आरोग्याचे संवर्धन आणि विकास साधण्यासाठी राबविण्यात येणार्‍या राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील 0 ते 18 वर्षे वयोगटातील जवळपास 2 कोटी मुलांना लाभ होत आहे. कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत
महाराष्ट्र राज्य अग्रेसर ठरले आहे. आरबीएसके कार्यक्रमांतर्गत अंगणवाडीस्तरावर 2023 ते मार्च 2024 या कालावधीत 0 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांची दोनवेळा तपासणी करण्यात आली. पहिल्या फेरीत 63,45,047; तर दुसर्‍या फेरीत 67,40,071 मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
शाळास्तरावर 1,22,06,627 मुलांची तपासणी करण्यात आली असून, 3,334 मुलांवर हृदयशस्त्रक्रिया तर 32,801 मुलांवर इतर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांची तपासणी करून जन्मत: असलेले व्यंग्य, लहान मुलांमधील आजार, जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार व अपंगत्व इत्यादी बाबींचे वेळेवर निदान करून योग्य उपचार केले जात आहेत. याचा लाभ राज्यातील 0 ते 18 वर्ष वयोगटातील जवळपास 2 कोटी मुलांना होत आहे.
किती पथके कार्यरत?
राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम 1 एप्रिल 2013 पासून लागू करण्यात आला. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाची पथके प्रत्येक तालुक्यात नियुक्त करण्यात आलेली असून, या पथकांचे मुख्यालय, ग्रामीण रुग्णालये किंवा संबंधित उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय असते. प्रत्येक पथकात 1 वाहन, 2 वैद्यकीय अधिकारी, 1 औषधी निर्माण अधिकारी, 1 एएनएम, तपासणी साहित्य आदींचा समावेश असतो. आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे गावनिहाय वेळापत्रक शिक्षण आणि महिला व बालकल्याण विभागांच्या समन्वयाने तयार केले जाते. त्यानंतर प्रत्येक पथकास ठरावीक वेळापत्रकाप्रमाणे तपासणी करण्याचे निर्देश देण्यात येतात.
हेही वाचा

पुणे हवामान विभागाच्या प्रमुखपदी पुन्हा डॉ. खोले
पुणेकरांना पाणीटंचाईच्या झळा; चार दिवसांमध्ये 133 तक्रारी
LokSabha Elections | हाय व्होल्टेज लढतीकडे परदेशी माध्यमांचेही लक्ष..