महाघातक कोरोना..! ६१३ दिवसांत रुग्‍णांच्‍या शरीरात तब्बल ५० वेळा उत्परिवर्तन

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कोरोना हे नाव उच्‍चारलं तरी आजही सर्वसामान्‍यांना धडकी भरते. चार वर्षांपूर्वी या विषाणूने संपूर्ण जगात हाहाकार माजवला होता. आता संपूर्ण जग या विळख्‍यातून बाहेर पडले आहे. मात्र संपूर्ण जगाला वेठीस धरलेल्‍या या विषाणूचे महाघातक रुप पुन्‍हा एकदा समोर आले आहे. कोरोना विषाणू एका रुग्‍णा्‍या शरीरात तब्‍बल ६१३ दिवस राहिला. या प्रदीर्घ …

महाघातक कोरोना..! ६१३ दिवसांत रुग्‍णांच्‍या शरीरात तब्बल ५० वेळा उत्परिवर्तन

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : कोरोना हे नाव उच्‍चारलं तरी आजही सर्वसामान्‍यांना धडकी भरते. चार वर्षांपूर्वी या विषाणूने संपूर्ण जगात हाहाकार माजवला होता. आता संपूर्ण जग या विळख्‍यातून बाहेर पडले आहे. मात्र संपूर्ण जगाला वेठीस धरलेल्‍या या विषाणूचे महाघातक रुप पुन्‍हा एकदा समोर आले आहे. कोरोना विषाणू एका रुग्‍णा्‍या शरीरात तब्‍बल ६१३ दिवस राहिला. या प्रदीर्घ काळात कोरोना विषाणूचे या रुग्‍णाच्‍या शरीरात तब्‍बल ५० वेळा उत्परिवर्तन (mutation) झाले. या काळात डॉक्‍टरांच्‍या मदतीने रुग्‍णाने कोरोना विषाणूविरोधात लढा दिला. अखेर कोरोना जिंकला आणि ७२ वर्षीय रुग्‍ण जगण्‍याची लढाई हराला. हा प्रकाराने विषाणू अनुवांशिकरित्या कसा बदलू शकतो, यावर प्रकाश पडला असल्‍याचे संशाेधकांनी म्‍हटलं आहे.
रुग्‍णाच्‍या शरीरात कोरोना विषाणू एवढ्या प्रदीर्घ काळ राहण्‍याची घटना डच येथे घडली. याबाबत ‘टाईम’ने दिलेल्‍या रिपोर्टनुसार, ॲमस्टरडॅम युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून असे समोर आले आहे की, रक्ताच्या आजाराने ग्रस्‍त असणार्‍या डचमधील ७२ वर्षीय रुग्‍णाला फेब्रुवारी 2022 मध्ये कोविड-19 ची लागण झाला होती. .यानंतर या 72 वर्षीय रुग्‍णाच्‍या शरीरात कोरोना विषाणू सतत 613 दिवस त्याचे स्वरूप बदलून हल्ला करत राहिला. या रुग्‍णाच्‍या शरीरात कोरोनाने ५० वेळा स्‍वत:चे स्‍वरुप बदलले. म्‍हणजे शरीरात उत्परिवर्तन (mutation) झाले. अशा परिस्थितीत रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाली. विशेष बाब म्हणजे कोरोना संसर्गाच्या संपर्कात येण्यापूर्वी
रुग्णाने घेतली होती कोरोना प्रतिबंधक लस
संशोधकांनी म्‍हटलं आहे की, 20 महिने चाललेला कोरोना संसर्ग आतापर्यंतचा सर्वात मोठा संसर्ग आहे. यापूर्वी एका ब्रिटीश रुग्‍णांच्‍या शरीरात कोरोना विषाणू 505 दिवसांपेक्षा अधिक काळ संसर्ग राहिला होता.
विषाणूच्या अनुवांशिकरित्या बदलावर पडला प्रकाश
संशोधकांनी म्‍हटलं आहे की, ओमिक्रॉन प्रकाराचा संसर्ग होण्यापूर्वी रुग्‍णाला कोविड-19 लसींचे अनेक डोस मिळाले असूनही, रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती टिकून राहिली नाही. संशोधनात असेही आढळले की, उत्परिवर्तननंतर विषाणूची ही आवृत्ती रुग्णाव्यतिरिक्त अन्‍य कोणालाही संसर्ग झाला नाही. महामारी निर्माण करणारा विषाणू अनुवांशिकरित्या कसा बदलू शकतो, ज्यामुळे रोगजनकांच्या नवीन प्रकारांना जन्म मिळतो. “हे प्रकरण रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींमध्ये सतत SARS-CoV-2 संसर्ग होण्याचा धोका हायलाइट करते,” असा निष्‍कर्षही संशोधनांनी मांडला आहे. हे संशोधन पुढील आवठडयात बार्सिलोना येथे होणाऱ्या वैद्यकीय परिषदेत संशोधकांकडून 7सादर केले जाणार आहे.
संशोधनात असेही दिसून आले आहे की, कोविड -19 साठी सकारात्मक चाचणी केलेल्या सुमारे 24% अमेरिकन प्रौढांना तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ त्याची लक्षणे जाणवली होती.

COVID patient’s infection lasts record 613 days—and accumulated over 50 mutations https://t.co/pgCVQ0o60H
— TIME (@TIME) April 19, 2024