
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री आरुषी शर्माने लव्ह आज कल २ मध्ये कार्तिक आर्यनसोबत अभिनय केला होता. या चित्रपटातून तिला बरीच प्रसिद्धी मिळाली होती. (Arushi Sharma Wedding) आरुषी शर्मा २०२० मध्ये सारा अली खान आणि कार्तिक आर्यनसोबत इम्तियाज अलीच्या ‘लव्ह आज कल’मध्ये दिसली होती. अभिनेत्रीने आता कास्टिंग डायरेक्टर वैभव विशांतशी लग्न केले आहे. दोघांच्याही इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर करण्यात आलेले नाहीत. (Arushi Sharma Wedding)
लग्न सोहळा १७ एप्रिल ते १८ एप्रिलपर्यंत हिमाचल प्रदेशाच्या जनेडघाट नजीक एका आलीशान हॉटेलमध्ये झाला. तिचे प्री-वेडिंग १७ एप्रिलला सायंकीळी ७ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत एका कॉकटेल पार्टीसोबत सुरु झालं होतं. त्यानंतर १८ एप्रिलला हळदी समारंभ झाला. १८ एप्रिलला सायंकीळी त्यांनी लग्नगाठ बांधली.
आरुषि शर्माच्या लग्नाचे फोटो त्यांच्या कुटुंबीयांनी शेअर केले आहेत. यामध्ये हे कपल गुलाबांच्या पाकळ्यांनी सजलेल्या एका मंचावर उभारून कॅमेरासाठी पोझ देताना दिसत आहेत. आरुषी पेस्टल लहंग्यात सुंदर दिसत आहे. तर वैभवने मॅचिंग शेरवानी घातली आहे. आणखी एका फोटोत ते मंडपात बसलेले दिसत आहेत.
कोण आहे वैभव विशांत?
वैभव विशांत बॉलीवूडमध्ये एक प्रसिद्ध नाव आहे, जे चित्रपट, वेब सीरीज आणि टेलीव्हिजन ॲड्ससाठी कास्टिंग करतात. त्यांनी ५० हून अधिक फीचर चित्रपट आणि वेब सीरीजसाठी काम केलं आहे. त्यांच्या काही चित्रपटांमध्ये ‘हैदर’, ‘पीके’, ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’, ‘बडे मियां छोटे मियां’ आणि ‘बदलापूर’ समाविष्ट आहे. त्यांनी वेब सीरीज ‘काला पानी’ साठी कास्टिंग डायरेक्टरच्या रूपातदेखील काम केलं आहे, ज्यामध्ये आरुषी शर्मा देखील होती.
आरुषीने इम्तियाज अलीचा चित्रपट ‘तमाशा’मध्ये एक छोटीशी भूमिका केली होती. २०२० मध्ये ती ‘लव्ह आज कल २’ मध्ये दिसली. आरुषी शर्माने नेटफ्लिक्स ड्रामा चित्रपट ‘जादूगर’ आणि सीरीज ‘काला पानी’मध्ये काम केलं होतं.
View this post on Instagram
A post shared by Arushi Sharma (@_arushisharma)
View this post on Instagram
A post shared by Arushi Sharma (@_arushisharma)
