राज्यात मातृवंदना योजनेच्या लाभार्थ्यांना घरघर!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : माता मृत्युदर व बाल मृत्युदर कमी करण्यासाठी आणि माता, बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने केंद्राकडून प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबवली जात आहे. योजनेंतर्गत वर्षभरात 1 लाख 85 हजार महिलांना लाभ झाल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गेल्या वर्षी 5,21,750 महिलांना लाभ मिळाला होता. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे नवीन पोर्टल 2.0 मध्ये …

राज्यात मातृवंदना योजनेच्या लाभार्थ्यांना घरघर!

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : माता मृत्युदर व बाल मृत्युदर कमी करण्यासाठी आणि माता, बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने केंद्राकडून प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबवली जात आहे. योजनेंतर्गत वर्षभरात 1 लाख 85 हजार महिलांना लाभ झाल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गेल्या वर्षी 5,21,750 महिलांना लाभ मिळाला होता. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे नवीन पोर्टल 2.0 मध्ये नोंदणी करण्यात आलेल्या लाभार्थीपैंकी 12 एप्रिल 2024 पर्यंत पीएफएमएस प्रणालीद्वारे 1 लाख 84 हजार 872 लाभार्थ्यांना लाभ वितरण करण्यात आले आहेत. योजनेंतर्गत एकूण 3 लाख 34 हजार 765 लाभार्थींनी नोंदणी केली होती. पात्र लाभार्थींना 65 कोटी 99 लाख 54 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या मिशन शक्ती मार्गदर्शक
सूचनेनुसार एप्रिल 2023 पासून प्रधानमंत्री मातृवंदना योजना नव्या अटींसह लागू करण्यात आलेली आहे. नवीन योजनेत पात्र गर्भवती व स्तनदा मातांना दोन टप्प्यांत 5000 रुपयांचा लाभ बँक खात्यात जमा केला जातो. दुसरे अपत्य मुलगी झाली तरच लाभार्थ्यांना एकाच टप्प्यात रु. 6000 रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत राज्यासाठी 2017 ते मार्च 2023 पर्यंत 34,07,604 लाभार्थींना लाभ देण्यात आलेला आहे. योजनेत केंद्राचा 60 टक्के व राज्याचा 40 टक्के सहभाग आहे.
कोणाला मिळतो लाभ?

ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न रु. 8 लाखांपेक्षा कमी आहे
अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती
ज्या महिला 40 टक्के किंवा पूर्णतः दिव्यांग आहेत
बीपीएल
शिधापत्रिकाधारक महिला
आयुष्मान भारतअंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत महिला लाभार्थी
किसान सन्मान निधीअंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी
मनरेगा जॉब कार्ड घेतलेल्या महिला
अन्नसुरक्षा
कायदा 2013
अंतर्गत रेशनिंग कार्डधारक महिला

कसा मिळतो लाभ?

मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून 150 दिवसांत गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर पहिला हप्ता प्राप्त होतो.
किमान एकदा प्रसूतिपूर्व तपासणी केल्यास गर्भधारणेचे 6 महिने पूर्ण झाल्यानंतर दुसरा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जातो.
प्रसूतीनंतर झालेल्या अपत्याची जन्मनोंदणी व बालकास बीसीजी, ओपीव्ही झीरो, तसेच पेन्टाव्हॅलेन्ट व ओपीव्हीचे 3 मात्रा अथवा समतुल्य लसीकरण पूर्ण झाल्यावर तिसरा हप्ता लाभार्थ्यांना जमा केला जातो.

हेही वाचा

संविधान वाचविण्यासाठी महाविकास आघाडीसोबत : ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड
Loksabha election 2024 | वसंत मोरेंनी भरला गुपचूप उमेदवारी अर्ज
पुन्हा कर्तव्य आहे : आकाश आणि वसुमध्ये फुलतंय प्रेमाचं नातं