क्रौर्याची परिसीमा! जखमांवर मिरचीपूड टाकली, फेवीक्विकने ओठ चिकटवले, महिलेवर बलात्कार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशातील गुना येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने एका मुलीसोबत क्रौर्याची परिसीमा ओलांडली. संशयित आरोपीने मुलीला ओलीस ठेवले. त्यानंतर तिला बेदम मारहाण केली. यानंतर त्याने मुलीच्या डोळ्यात मिरचीपूड फेकली. मग तिच्या जखमांवर आणि तोंडात मिरचीपूड भरून तिचे ओठ फेवीक्विकने चिकटवले. जेणेकरुन तिची आरडाओरड कोणाला ऐकू नये म्हणून. पण पीडितेने हा संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला.
पीडीत महिलेला शेजाऱ्याने एक महिना खोलीत कोंडून ठेवले आणि तिच्यावर बलात्कार केला. ती ओरडू नये म्हणून तिचे ओठ चिकटवले आणि तिच्या जखमांवर मिरचीपूड टाकून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिलेला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असून पोलिसांनी संशयित आरोपी अयान पठाण याला अटक केली आहे.
संबंधित बातम्या :
Rape Case : आईने जेवायला घरी बोलावले सांगत अल्पवयीन मुलीवर बलात्कार
लग्न झालेले माहिती असतानाही संमतीने ठेवलेले संबंध बलात्कार नाही
लग्नाचे वचन मोडल्याने दाखल बलात्काराचा गुन्हा कोर्टाकडून रद्द
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २३ वर्षीय महिला तिच्या आईसोबत गुना येथे राहत होती. पीडित महिला आणि शेजारी राहणारा अयान पठाण हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. पीडितेने त्याच्याशी लग्न करावे आणि तिच्या पालकांची संपत्ती त्याच्या नावावर करावी, अशी मागणी अयान करत होता. त्यानंतर पीडितेची आई तिला घेऊन शिवपुरी येथे राहायला गेली. एक महिन्यापूर्वी अयान याने पीडितेला जबरदस्तीने त्याच्या घरी नेले, तिथे त्याने तिला एका खोलीत कोंडून ठेवले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. बेल्टने आणि पाईपने मारहाण केली. सुमारे एक महिना तो तिच्यावर अत्याचार करत होता.
मंगळवारी (दि.१६) रात्री अयान याने पुन्हा तिला मारहाण केली. तिच्या डोळ्यात आणि तोंडामध्ये मिरचीपूड टाकली. ती ओरडू नये म्हणून तिचे ओठ चिकटवले. यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती. रात्री ती कशीतरी घरातून पळून जाण्यात यशस्वी झाली. रात्रभर ५ किलोमीटर चालत सकाळी छावणी पोलीस ठाण्यात पोहोचली. तिची अवस्था पाहून पोलिसही चक्रावून गेले. तिचे ओठ चिकटवले होते. तिचे डोळे सुजलेले होते आणि तिच्या शरीरावर जखमेच्या खुणा दिसत होत्या. पीडित महिलेला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तक्रारीनंतर पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.
हेही वाचा :
रक्षकच बनला भक्षक! पोलिस उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा
जेलमध्ये 270 हून अधिक महिला कैद्यांवर बलात्कार; राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्यूरोचा अहवाल
Jalgaon Crime | बलात्कार आणि खून करणाऱ्या आरोपीला तीन तासात अटक
