आदिमायेच्या जयघोषाने दुमदुमले सप्तशिखर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान, साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्री सप्तशृंग निवासिनी देवीच्या चैत्रोत्सवास प्रारंभ झाला. पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. खानदेश प्रांतातील नंदुरबार, नवापूर, धुळे, साक्री, शिरपूर, जळगाव, धरणगाव, मालेगावसह मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यांतील पालख्या व भाविक गडावर दाख‌ल होत आहेत. त्यांच्या गर्दीने परिसर फुलला असून, …

आदिमायेच्या जयघोषाने दुमदुमले सप्तशिखर

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान, साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्री सप्तशृंग निवासिनी देवीच्या चैत्रोत्सवास प्रारंभ झाला. पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. खानदेश प्रांतातील नंदुरबार, नवापूर, धुळे, साक्री, शिरपूर, जळगाव, धरणगाव, मालेगावसह मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यांतील पालख्या व भाविक गडावर दाख‌ल होत आहेत. त्यांच्या गर्दीने परिसर फुलला असून, संपूर्ण सप्तशिखर हे आदिमायेच्या जयघोषाने दुमदुमत आहे.
शुक्रवारी (दि. १९) सकाळची पंचामृत महापूजा विश्वस्त ॲड. ललित निकम यांच्या हस्ते सहकुटुंब करण्यात आली. या वेळी संस्थानचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, इस्टेट कस्टडियन प्रकाश पगार यांच्यासह सर्व विभागप्रमुख व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. यात्राेत्सवादरम्यान दोन वेळचे मोफत अन्नदान (महाप्रसाद) सुविधा देण्यात येत आहे. भाविकांच्या सुविधेसाठी २४ तास मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. वाढत्या उन्हामुळे भाविकांसाठी मंदिर परिसरात १२ पाणपोईंची व्यवस्था करण्यात आली आहे. सप्तशृंगगडावर व परिसरात आग लागून कुठलीही जीवित अथवा वित्त हानी होऊ नये म्हणून २४ तास अग्निशमन बंबाची व्यवस्था करण्यात आली आहे.
हेही वाचा –

बारामती मतदारसंघात अखेरच्या दिवशी 24 उमेदवारांचे अर्ज
Dindori Lok Sabha J.P. Gavit | ‘माकप’च्या गावितांचा बंडाचा झेंडा, दिंडोरीतून उमेदवारी जाहीर