Odisha | ओडिशातील महानदीत बोट उलटून मोठी दुर्घटना, तिघांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

पुढारी ऑनलाईन डेस्क : ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी मोठी दुर्घटना घडली. येथील लखनपूरजवळ महानदीत प्रवाशांनी भरलेली बोट उलटली. या बोटीतून ५० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. शनिवारी सकाळपर्यंत नदीतून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पण महिला आणि लहान मुलांसह सातजण अद्याप बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. …

Odisha | ओडिशातील महानदीत बोट उलटून मोठी दुर्घटना, तिघांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी मोठी दुर्घटना घडली. येथील लखनपूरजवळ महानदीत प्रवाशांनी भरलेली बोट उलटली. या बोटीतून ५० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. शनिवारी सकाळपर्यंत नदीतून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पण महिला आणि लहान मुलांसह सातजण अद्याप बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेतून ४८ लोकांना वाचवण्यात आले.

प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्वजण शेजारच्या छत्तीसगड राज्यातील रहिवासी आहेत. ही बोट छत्तीसगडमधील खरसेनी येथून बारगड जिल्ह्यातील अंबाभोनामधील पाथरसेनी येथे जात होती. ज्यावळी बोट उलटली त्यावेळी स्थानिक मच्छीमार तेथे होते. त्यांनी धाडस दाखवत ४० हून अधिक लोकांना वाचवले.

दरम्यान, महानदीतील जोरदार लाटांमुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. दोन पाण्याखालील शोध कॅमेऱ्यांसह पाच स्कूबा डायव्हर्स घटनास्थळी बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत. भाटली, बारगड, लखनपूर आणि संबलपूर येथील बचाव पथकेही बचावकार्य करत आहेत.

बोट दुर्घटनेत जीवितहानी झाल्याचे समजल्यानंतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना ४ लाखांची मदत जाहीर केली आहे.