PM मोदींच्या सुरक्षा त्रुटीप्रकरणी सात पोलिस अधिका-यांचे निलंबन

पुढारी ऑनलाईन डेस्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जानेवारी 2022 मधील पंजाब दौऱ्यादरम्यान सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात भटिंडाचे एसपी गुरबिंदर सिंग यांच्यासह सहा पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. केंद्रीय समितीच्या अहवालानुसार, पंजाब सरकारकडून ही कारवाई करण्यात आली आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे. (PM Narendra Modi’s Security) PM Narendra Modi’s … The post PM मोदींच्या सुरक्षा त्रुटीप्रकरणी सात पोलिस अधिका-यांचे निलंबन appeared first on पुढारी.
#image_title

PM मोदींच्या सुरक्षा त्रुटीप्रकरणी सात पोलिस अधिका-यांचे निलंबन

पुढारी ऑनलाईन डेस्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जानेवारी 2022 मधील पंजाब दौऱ्यादरम्यान सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात भटिंडाचे एसपी गुरबिंदर सिंग यांच्यासह सहा पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. केंद्रीय समितीच्या अहवालानुसार, पंजाब सरकारकडून ही कारवाई करण्यात आली आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे. (PM Narendra Modi’s Security)
PM Narendra Modi’s Security: कर्तव्यात कसूर, भटिंडा एसपी निलंबित
५ जानेवारी, २०२२ रोजी पीएम मोदी पंजाब दौऱ्यावर होते. दरम्यान पंजाब सरकारने पंतप्रधानांचा ताफा अडविल्यावरून १५० आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी पोलिस अधिकारी एसपी गुरबिंदर सिंग हे कर्त्याव्यावर होते. पीएम मोदी यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान सुरक्षेत त्रुटी आढळल्याने गुरबिंदर सिंग यांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल जबाबदार धरण्यात आले. यावरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. यांच्यासह अन्य सहा पोलिस अधिकाऱ्यांवर देखील या प्रकरणी कारवाई कऱण्यात आली आहे.
एसपी गुरबिंदर सिंग यांच्यासह सहा पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई
पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी असल्याच्या प्रकरणात भटिंडा एसपी गुरबिंदर सिंग, डीएसपी पारसन सिंग, डीएसपी जगदीश कुमार, इन्स्पेक्टर तेजिंदर सिंग, इन्स्पेक्टर बलविंदर सिंग, इन्स्पेक्टर जतिंदर सिंग आणि एएसआय राकेश कुमार या सात पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे.

Seven Police officers – Bathinda SP Gurbinder Singh, DSP Parson Singh, DSP Jagdish Kumar, Inspector Tejinder Singh, Inspector Balwinder Singh, Inspector Jatinder Singh and ASI Rakesh Kumar suspended in the case involving PM Narendra Modi’s security lapse in Punjab on January 5,…
— ANI (@ANI) November 26, 2023

 केंद्रीय समिती अहवालानुसार पंजाब सरकारकडून कारवाई
पंजाब दौर्‍यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटींच्या ( pm security breach ) चौकशीसाठी त्रिसदस्यीय केंद्रीय समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने आठ महिन्यांपूर्वी ऑगस्ट 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारला हा अहवाल सादर केला होता. या अहवालाच्या आधारे केंद्राने सप्टेंबर २०२२ मध्ये पंजाब सरकारला पत्र लिहून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास सांगितले होते. समितीच्या अहवालानुसार, पंजाब सरकारकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा:

पारंपरिक व्यवसायाचे अर्थव्यवस्थेत मोठे योगदान : केंद्रिय मंत्री पीयुष गोयल
Mumbai 26/11 : “हाच तो दहशतवादी…” : कसाबला ओळखणारी ९ वर्षांची चिमुरडी आज काय करते?
iffi awards 2023 : नवाजुद्दीन सिद्दीकीची आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एन्ट्री

 
The post PM मोदींच्या सुरक्षा त्रुटीप्रकरणी सात पोलिस अधिका-यांचे निलंबन appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जानेवारी 2022 मधील पंजाब दौऱ्यादरम्यान सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात भटिंडाचे एसपी गुरबिंदर सिंग यांच्यासह सहा पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. केंद्रीय समितीच्या अहवालानुसार, पंजाब सरकारकडून ही कारवाई करण्यात आली आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे. (PM Narendra Modi’s Security) PM Narendra Modi’s …

The post PM मोदींच्या सुरक्षा त्रुटीप्रकरणी सात पोलिस अधिका-यांचे निलंबन appeared first on पुढारी.

Go to Source