चंद्रपूर लोकसभेसाठी 55.11 टक्के मतदान; मुनगंटीवार, धानोरकर, बेले यांचे भवितव्य मशिनबंद

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा:  चंद्रपूर लोकसभा मतदार संघाकरीता आज (दि.१९) पार पडलेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसचे उमेदवार प्रतिभा धानोरकर, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेल यांचेसह 15 उमेदवारांचे भाग्य मशिन बंद झाले. 4 जून ला उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 55.11 टक्के मतदान झाले असून काही किरकोळ घटना वगळता …

चंद्रपूर लोकसभेसाठी 55.11 टक्के मतदान; मुनगंटीवार, धानोरकर, बेले यांचे भवितव्य मशिनबंद

चंद्रपूर : Bharat Live News Media वृत्तसेवा:  चंद्रपूर लोकसभा मतदार संघाकरीता आज (दि.१९) पार पडलेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसचे उमेदवार प्रतिभा धानोरकर, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेल यांचेसह 15 उमेदवारांचे भाग्य मशिन बंद झाले. 4 जून ला उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 55.11 टक्के मतदान झाले असून काही किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. सकाळी अकरा वाजेपर्यंत उमेदवार मुनगंटीवार, धानोरकर, बेले यांचेसह विद्यमान आमदार किशोर जोरगेवार, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. Chandrapur Lok Sabha
सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश असलेल्या चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात आज शुकवारी सकाळी सात वाजता पासूनर मतदानाला सुरूवात झाली. मतदारसंघात एकूण 18 लक्ष 37 हजार 906 मतदारांकरीता 2118 मतदान केंद्राचा समावेश होता. सकाळी 7 वाजतापासुन तर दुपारी 3 वाजेपर्यंत 43.48 टक्के मतदान पार पडले. त्यानंतर 5 वाजतापर्यंत सरासरी 55.11 टक्के मतदान झाले. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या सहा विधानसभा क्षेत्रात सायंकाळी 5 वाजतापर्यंत 70-राजुरा 59.14 टक्के, 71-चंद्रपूर 48.20 टक्के, 72-बल्लारपूर 59.06 टक्के, 75-वरोरा 57.56 टक्के, 76-वणी 58.87 टक्के, 80-आर्णी 49.70 टक्के मतदान पार पडले. आर्णी व व चंद्रपूर विधानसभा क्षेत्रामध्ये 50 टक्याच्या खाली मतदान झाले. उर्वरित विधानसभा क्षेत्रात साठ टक्यांपर्यंत मतदानाची टक्केवारी पोहचली आहे. Chandrapur Lok Sabha
दिवभर एक दोन किरकोळ घटना वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. सकाळी नऊ वाजतापर्यंत काँग्रेसचे उमेदवार प्रतिभा धानोरकर, वंचित बहुजन आघाडीचे राजेश बेल यांनी मतदान केला. त्यानंतर अकरापर्यंत भाजपचे उमदेवार सुधीर मुनगंटीवार यांनी महाकाली मातेचे आशिर्वाद घेऊन मतदान केले. दुपारी चार वाजेपर्यंत तापमानाचा पारा 43.2 अंशावर असल्याने त्याचा मतदानावर परिणाम पहायला मिळाला. चंद्रपूरात फक्त 48.2.0 टक्केच मतदान झाला आहे. तर आर्णी मध्ये त्यापाठोपाठ 49.70 टक्केच मतदान पार पडले. पाच वाजेपर्यंत 55.11 टक्के सरासरीने मतदान झाला असून उर्वरित तासभराच्या 5 ते 6 वाजताचे कालावधीत दहा ते बारा टकके मतदान वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.
प्रतिभा धानोरकरांच्या नावापुढे कॅन्सलचा शिक्का !
मतदान केंद्रावर उमेदवारांच्या याद्या लावण्यात येतात. त्यावर कॅन्सल असे लिहिण्यात येते. परंतु हिंदी सिटी हायस्कुल वरील मतदान केंद्रावर काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांचया नावाच्या समोरच कॅन्सलचा शिक्का मारण्यात आल्याचा प्रकरण समोर आल्याने हिंदी सिटी हायस्कूल केंद्रावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. या प्रकाराचा निषे करून भाजपचे उमदेवार सुधीर मुनगंटीवार यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत पक्षपात केला जात असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. नेमका काँग्रेस उमेदवाराच्या नावावरच कॅन्सलचा शिक्का कसा मारला, असा प्रश्न करून कार्यकर्त्यांनी निवडणूक अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी केली.
तासभरासाठी ईव्हीएम बंद
चंद्रपूर शहरातील ज्युबिली हायस्कुल मध्ये सकाळच्या वेळी तासभरासाठी ईव्हीएम बंद पडली. त्यामुळे मतदारांची चांगलीच तारांबळ उडाली. व्हिव्हिपॅट मध्ये प्रॉब्लेम आल्यामुळे ईव्हीएम मशीन बंद झाल्याने मतदारांना वाट पहावी लागली. त्यामुळे बराच मतदार मतदान न करताच घरी गेल्याची माहिती सुत्रांनी दिली. तर अनेक मतदारांचे नावच मतदार याद्यांमध्ये न आल्याने अनेकांना मतदान करता आले नाही.
हेही वाचा 

चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात अकरा वाजेपर्यंत १८.९४ टक्के मतदान
Lok Sabha Election 2024 | चंद्रपूर : मतदानाच्या दिवशी शुक्रवारी भरपगारी सुट्टी
चंद्रपूर : एटीएम मधून पैसे चोरणाऱ्या टोळीस अटक