गॅरंटी तीन शब्दांचा खेळ नाही : पंतप्रधान मोदी

वर्धा; पुढारी वृत्तसेवा : गुजरातमध्ये माझा जन्म झाला असला तरीही वर्धा -अमरावतीशी माझं विशेष नात आहे. महात्मा गांधी यांचा जन्म गुजरातमध्ये झाला. वर्धा कर्मभूमी राहिली. २०२४ ची निवडणुक आत्मनिर्भर भारत स्वप्न पूर्ण करण्याची निवडणूक आहे. बापूनी हे स्वप्न पाहिलं होत. त्याच दिशेने आता आपण जात आहोत. २०१४ पूर्वी ही धारणा झाली होती की, काही चांगले …

गॅरंटी तीन शब्दांचा खेळ नाही : पंतप्रधान मोदी

वर्धा; Bharat Live News Media वृत्तसेवा : गुजरातमध्ये माझा जन्म झाला असला तरीही वर्धा -अमरावतीशी माझं विशेष नात आहे. महात्मा गांधी यांचा जन्म गुजरातमध्ये झाला. वर्धा कर्मभूमी राहिली. २०२४ ची निवडणुक आत्मनिर्भर भारत स्वप्न पूर्ण करण्याची निवडणूक आहे. बापूनी हे स्वप्न पाहिलं होत. त्याच दिशेने आता आपण जात आहोत. २०१४ पूर्वी ही धारणा झाली होती की, काही चांगले होऊ शकत नाही. सगळीकडे निराशा होती. ज्यांना कुणी विचारलं नाही, त्यांना या गरीब मुलांनी विचारलं आहे. गॅरंटी देण्यासाठी खूप हिम्मत लागते, ती अशीच देता येत नाही. माझ्यासाठी ही गॅरंटी तीन शब्दांचा खेळ नाही, तर प्रत्येक क्षणाची मेहनत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
वर्धा जिल्ह्यातील तळेगाव (श्यामजी पंत) येथे महायुतीचे वर्धा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रामदास तडस, अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली. यावेळी पंतप्रधान मोदी बोलत होते. सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अतुल सावे, रामदास तडस, नवनीत राणा, अनिल बोंडे, प्रवीण पोटे, आमदार दादाराव केचे, पंकज भोयर, समीर कुनावार, प्रताप अडसड, देवेंद्र भुयार, रवी राणा, अशोक शिंदे, सुबोध मोहिते, उपेंद्र कोठेकर, विजय आगलावे, सुनील गफाट, सरिता गाखरे, सुमित वानखेडे आदिंची उपस्थिती होती.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी २०१४ पूर्वी अनेक सिंचन योजना रखडल्या होत्या. त्या पूर्ण करत असून या संपूर्ण परिसरात सिंचनाचे अनेक छोटे प्रोजेक्ट आणत असल्याचे सांगितले. तसेच अयोध्येत पाचशे वर्षानंतर राम मंदिराची स्थापना झाली, त्यावर देखील इंडिया आघाडीमधील नेत्यांनी टीका केली असल्याचे सांगत काँग्रेसला माहिती आहे, ते ही निवडणूक जिंकू शकत नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही भूमी स्वातंत्र्याची भूमी आहे. महात्मा गांधीजींची भूमी आहे. महात्मा गांधींनी सांगितलं होतं. आता देशाला स्वातंत्र्य मिळाल आहे, काँग्रेस विसर्जित करा. पण काँग्रेसवाल्यांनी ऐकलं नाही. वर्धावाल्यांनी ऐकलं आणि काँग्रेस विसर्जित करायला सुरुवात केली. शरद पवार यांनी काँग्रेसचा पंजा विसर्जित केला. काँग्रेसची इतकी केविलवाणी स्थिती यापूर्वी कधीही पाहिली नव्हती, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच सर्व समाजाला सोबत घेऊन पंतप्रधान मोदी  पुढे चालले असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा :

लोकसभा निवडणुकीसाठी 450 युवा मतदान केंद्र, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक 36 केंद्र
Lok Sabha Election 2024: प्रतिभा धानोरकरांच्या नावापुढे कॅन्सलचा शिक्का, काँग्रेस कार्यकर्ते भडकले
Arrest of Arvind Kejriwal: केजरीवाल तुरुंगात काय खातात? न्यायालय करणार तपासणी