रायगड : रेल्वे प्रवाशांसाठी विशेष सेवा; पनवेल-नांदेड दरम्यान धावणार ४० गाड्या

रोहे; पुढारी वृत्तसेवा : उन्हाळी हंगामात अधिक गाड्यांच्या प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद म्हणून प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने पनवेल-नांदेड दरम्यान अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पनवेल-हुजूर साहेब नांदेड उन्हाळी विशेष (४० फेर्‍या) गाडी क्रमांक ०७६२६ द्वि-साप्ताहिक विशेष गाडी दि. २३.०४.२०२४ ते दि. २७.०६.२०२४ पर्यंत दर मंगळवार आणि गुरुवारी १४.३० वाजता पनवेल …

रायगड : रेल्वे प्रवाशांसाठी विशेष सेवा; पनवेल-नांदेड दरम्यान धावणार ४० गाड्या

रोहे; Bharat Live News Media वृत्तसेवा : उन्हाळी हंगामात अधिक गाड्यांच्या प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद म्हणून प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने पनवेल-नांदेड दरम्यान अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
पनवेल-हुजूर साहेब नांदेड उन्हाळी विशेष (४० फेर्‍या) गाडी क्रमांक ०७६२६ द्वि-साप्ताहिक विशेष गाडी दि. २३.०४.२०२४ ते दि. २७.०६.२०२४ पर्यंत दर मंगळवार आणि गुरुवारी १४.३० वाजता पनवेल येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४.३० वाजता हुजूर साहेब नांदेड येथे पोहोचेल. (२० फेर्‍या), गाडी क्रमांक ०७६२५ द्वि-साप्ताहिक विशेष गाडी दि. २२.०४.२०२४ ते दि. २६.०६.२०२४ पर्यंत दर सोमवार आणि बुधवारी २३.०० वाजता हुजूर साहेब नांदेड येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १३.२५ वाजता पनवेल येथे पोहोचेल. (२० फेर्‍या) या गाडीसाठी कल्याण, इगतपुरी, नाशिक, मनमाड, नागरसोल, रोटेगांव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत, परभणी आणि पूर्णा हे थांबे देण्यात आले आहे. या गाडीची संरचना १३ वातानुकूलित- तृतीय, ६ शयनयान, १ वातानुकूलित बुफे कार आणि २ सामान, जनरेटर आणि ब्रेक व्हॅन. (२२ डब्बे) अशी आहे.
या गाडीसाठी आरक्षण विशेष ट्रेन क्रमांक ०७६२६ चे बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर विशेष शुल्कावर दि. २०.०४.२०२४ रोजी उघडेल. विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा. प्रवाशांनी या उन्हाळी विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा :

काँग्रेसने उभा केलेला देश भाजपने विकायला काढला : कुणाल पाटील यांचा आरोप
Prakash Ambedkar : शिंदे दोन महिन्यांनंतर दिसणार नाहीत : प्रकाश आंबेडकर
Kolhapur Lok Sabha | ब्रेकिंग! कोल्हापुरात काँग्रेसमध्ये बंड; बाजीराव खाडे यांच्याकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल