सफाई, विद्युत कर्मचार्‍यांची भूमिका महत्त्वाची : प्रवीण कुमार पाटील

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यात सार्वजनिक उत्सव साजरे होताना काही कार्यकर्ते समोर दिसतात आणि काही पडद्यामागून काम करत असतात. जे कार्यकर्ते दिसत नाहीत त्यांचे काम मोठे आहे. उत्सव यशस्वी होतो तेव्हा त्यात सफाई कर्मचारी आणि विद्युत कर्मचारी यांची भूमिका महत्त्वाची असते, असे मत अपर पोलिस आयुक्त प्रवीण कुमार पाटील यांनी व्यक्त केले. मानाचा चौथा … The post सफाई, विद्युत कर्मचार्‍यांची भूमिका महत्त्वाची : प्रवीण कुमार पाटील appeared first on पुढारी.
#image_title

सफाई, विद्युत कर्मचार्‍यांची भूमिका महत्त्वाची : प्रवीण कुमार पाटील

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यात सार्वजनिक उत्सव साजरे होताना काही कार्यकर्ते समोर दिसतात आणि काही पडद्यामागून काम करत असतात. जे कार्यकर्ते दिसत नाहीत त्यांचे काम मोठे आहे. उत्सव यशस्वी होतो तेव्हा त्यात सफाई कर्मचारी आणि विद्युत कर्मचारी यांची भूमिका महत्त्वाची असते, असे मत अपर पोलिस आयुक्त प्रवीण कुमार पाटील यांनी व्यक्त केले.
मानाचा चौथा महागणपती श्री तुळशीबाग गणपती मंडळ आणि हुतात्मा बाबू गेनू मंडळ यांच्या वतीने महापालिकेच्या सफाई कर्मचारी आणि विद्युत कर्मचारी यांचा दिवाळीनिमित्त कृतज्ञता सन्मान करण्यात आला. पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, परिमंडळ 1 चे पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्टचे सरचिटणीस हेमंत रासने, श्री तुळशीबाग गणपती मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, हुतात्मा बाबूगेनू मंडळाचे सोमनाथ पवार आदी उपस्थित होते.
डॉ. खेमनार म्हणाले, सफाई कर्मचारी आणि विद्युत विभागातील कर्मचारी हे केवळ कर्तव्य म्हणून आपले काम करत नाहीत, तर हे आपले काम आहे, असे समजून मनापासून त्यांचे काम करतात. त्यांचा सन्मान आणि कौतुक केल्यामुळे कामाला उत्साह येतो.
संदीपसिंह गिल म्हणाले, सफाई कर्मचार्‍यांनी जर कचरा उचलला नाही तर सामाजिक आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे त्यांच्या कार्याचा आपण योग्य सन्मान केला पाहिजे. नितीन पंडित यांनी प्रास्ताविक केले. दुर्गेश नवले यांनी आभार व्यक्त केले. मिलिंद होनराव यांनी सूत्रसंचालन केले.
हेही वाचा
प्रारंभिक आकाशगंगांमध्ये रहस्यमय जड घटक
कोल्हापूर : रस्त्यासाठी मिळणार आणखी 90 कोटी
Nagar News : मुळा धरणातून आज पाणी सोडणार!
The post सफाई, विद्युत कर्मचार्‍यांची भूमिका महत्त्वाची : प्रवीण कुमार पाटील appeared first on पुढारी.

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यात सार्वजनिक उत्सव साजरे होताना काही कार्यकर्ते समोर दिसतात आणि काही पडद्यामागून काम करत असतात. जे कार्यकर्ते दिसत नाहीत त्यांचे काम मोठे आहे. उत्सव यशस्वी होतो तेव्हा त्यात सफाई कर्मचारी आणि विद्युत कर्मचारी यांची भूमिका महत्त्वाची असते, असे मत अपर पोलिस आयुक्त प्रवीण कुमार पाटील यांनी व्यक्त केले. मानाचा चौथा …

The post सफाई, विद्युत कर्मचार्‍यांची भूमिका महत्त्वाची : प्रवीण कुमार पाटील appeared first on पुढारी.

Go to Source