चंद्रपूर लोकसभा मतदार संघात ५५.११ टक्के मतदान

चंद्रपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या आज (दि.१९) सुरू असलेल्या निवडणुकीत सायंकाळी ५ वाजतापर्यंत ५५.११ टक्के मतदान झाले असून आणखी एक तासाच्या मतदानाची टक्केवारी येणे बाकी आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लक्ष ३७ हजार ९०६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. सकाळी ७ वाजतापासून तर दुपारी ३ वाजेपर्यंत ४३.४८ टक्के मतदान पार पडले. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या सहा विधानसभा क्षेत्रात सायंकाळी ५ वाजतापर्यंत ७०-राजुरा ५९.१४ टक्के, ७१-चंद्रपूर ४८.२० टक्के, ७२-बल्लारपूर ५९.०६ टक्के, ७५-वरोरा ५७.५६ टक्के, ७६-वणी ५८.८७ टक्के, ८०-आर्णी ४९.७० टक्के मतदान पार पडले. आर्णी व व चंद्रपूर विधानसभा क्षेत्रामध्ये ५० टक्याच्या खाली टक्केवारी आहे. तर उर्वरित विधानसभा क्षेत्रात साठ टक्यांपर्यंत मतदानाची टक्केवारी आहे. उर्वरित तासभराच्या मतदानाची टक्केवारी येणे बाकी आहे.
हेही वाचा :
लोकसभा निवडणुकीसाठी 450 युवा मतदान केंद्र, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक 36 केंद्र
भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले सहकुटुंब मतदान
Lok Sabha Election 2024: प्रतिभा धानोरकरांच्या नावापुढे कॅन्सलचा शिक्का, काँग्रेस कार्यकर्ते भडकले
