कोल्हापूर: मतदानादिवशी MIDC बंद राहणार

शिरोली एमआयडीसी: Bharat Live News Media वृत्तसेवा: कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक आणि कामगार वर्गांला मतदान करता यावे. कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी मतदानादिवशी मंगळवारी (दि. ७) जिल्ह्यातील औद्योगिक कारखाने, आस्थापना बंद ठेवण्याचा एकमुखी निर्णय औद्योगिक संघटनांच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या बैठकीत घेण्यात आला. स्मॅकचे चेअरमन सुरेंद्र जैन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आज (दि.१९) संपन्न झाली. Lok Sabha Election 2024
उद्योजक आणि कामगारांनी उत्स्फूर्तपणे या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे. स्टाफ व कामगारांनी मतदानामध्ये सहकुटुंब सहभागी व्हावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, मतदानादिवशी जाहीर केलेल्या सुट्टीच्या बदल्यात सर्व औद्योगिक संघटनांनी आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी (दि. ६) साप्ताहिक सुट्टी दिवशी कामकाज सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच मंगळवारी (दि.७) सुट्टी देण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. Lok Sabha Election 2024
यावेळी स्मॅकचे उपाध्यक्ष जयदीप चौगले, कोल्हापूर इंजिनियरिंग असोसिएशनचे अध्यक्ष बाबासो कोंडेकर, उपाध्यक्ष कमलाकर कुलकर्णी, गोशिमाचे अध्यक्ष नितीनचंद्र दलवाई, उपाध्यक्ष स्वरूप कदम, मॅकचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, उपाध्यक्ष मोहन कुशिरे, पदाधिकारी व संचालक उपस्थित होते.
हेही वाचा
कोल्हापूर: विशाळगडावर बिबट्याकडून गायीचा फडशा; नागरिकांत भीतीचे वातावरण
Kolhapur Lok Sabha Election : कोल्हापूरच्या लढतीत नेत्यांची कसोटी; बंडखोरी नसली तरी…
कोल्हापूर : जि. प. लेखाधिकार्याचे अपहरण करून मारहाण
