जळगावात वंचितचे उमेदवार प्रफुल्ल लोढा यांची माघार

जळगांव Bharat Live News Media वृत्तसेवा– लोकसभेसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याच्या दुसऱ्या दिवशी 42 उमेदवारांनी 106 अर्ज घेतले आहेत. यामध्ये जळगाव लोकसभेचे उबाठा शिवसेनाचे उमेदवार करण पवार यांच्या प्रतिनिधीने 8 अर्ज नेली आहे. तर रावेर लोकसभेचे शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रतिनिधीने चार अर्ज दिले आहेत. तर जळगाव लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीने नकार दिला आहे. त्यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी यास दुजोरा दिला असून काही तांत्रिक कारणामुळे मी उमेदवारी करू शकणार नसल्याचे म्हटले आहे.
जळगाव जिल्ह्यातील लोकसभा निवडणुका या चौथ्या टप्प्यात होणार आहे. या चौथ्या टप्प्यासाठी 18 तारखेपासून नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. दुसऱ्या दिवशी रावेर लोकसभेतून 17 उमेदवारांनी 46 अर्ज केले आहेत. यात विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रतिनिधीने 4 अर्ज नेले. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कडून माजी आमदार संतोष छबिलदास चौधरी यांच्यावतीने हर्षल जैन यांनी चार अर्ज घेतले आहेत. त्यामुळे रावेर लोकसभेमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून दोन उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र खरेदी केल्यामुळे रिंगणात कोण राहणार ज्याचे नाव घोषित केले तो की दुसरा उमेदवार शेवटी एबी फॉर्म कोणाला मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. रावेर गटातून बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, एम आय एम, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्पेशल व अपक्ष उमेदवारांनी अर्ज लिहिले आहे.
हेही वाचा –
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात दुपारी ३ वाजतापर्यंत ५४.९९ टक्के मतदान
Vidarbha Lok Sabha Election : पूर्व विदर्भात प्रतिष्ठेच्या, चुरशीच्या लढती
कोल्हापूर: विशाळगडावर बिबट्याकडून गायीचा फडशा; नागरिकांत भीतीचे वातावरण
