जगातील पहिले इलेक्ट्रिक फ्लाईंग शिप

स्टॉकहोम : सध्या उडत्या मोटारी, उडती टॅक्सी चर्चेचा विषय बनलेल्या असतात. आता जगातील पहिली इलेक्ट्रिक फ्लाईंग पॅसेंजर शिप चर्चेत आले आहे. या ‘उडत्या’ जहाजाने स्विडनमध्ये आपल्या चाचण्या यशस्वी केल्या आहेत. आता स्टॉकहोमच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत 2024 मध्ये समाविष्ट होण्यासाठी हे इलेक्ट्रिक फ्लाईंग शिप सज्ज झाले आहे. त्यासाठी त्याचे आता मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू होणार आहे. … The post जगातील पहिले इलेक्ट्रिक फ्लाईंग शिप appeared first on पुढारी.
#image_title

जगातील पहिले इलेक्ट्रिक फ्लाईंग शिप

स्टॉकहोम : सध्या उडत्या मोटारी, उडती टॅक्सी चर्चेचा विषय बनलेल्या असतात. आता जगातील पहिली इलेक्ट्रिक फ्लाईंग पॅसेंजर शिप चर्चेत आले आहे. या ‘उडत्या’ जहाजाने स्विडनमध्ये आपल्या चाचण्या यशस्वी केल्या आहेत. आता स्टॉकहोमच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत 2024 मध्ये समाविष्ट होण्यासाठी हे इलेक्ट्रिक फ्लाईंग शिप सज्ज झाले आहे. त्यासाठी त्याचे आता मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू होणार आहे. हे छोटे जहाज पाण्याच्या पृष्ठभागावर उचलले जाऊन वेगाने पुढे जाते व त्यामुळे ते जणु काही उडत आहे असा भास होतो!
या उडत्या इलेक्ट्रिक जहाजाला ‘कँडेला पी-12’ असे नाव आहे. स्विडीश टेक कंपनी कँडेला टेक्नॉलॉजी एबीने हे जहाज विकसित केले आहे. ते 39 फूट लांब असून 252 किलोवॅट-अवर बॅटरीवर चालते. त्यामधून तीस प्रवासी प्रवास करू शकतात. विशेष म्हणजे टेस्लाच्या 2024 ’मॉडेल 3’मध्ये 75 किलोवॅट-अवरची बॅटरी आहे. हे जहाज 25 नॉट्स म्हणजेच ताशी 46 किलोमीटरच्या वेगाने उडू शकते. अर्थात त्याचा कमाल वेग 30 नॉट्स म्हणजेच ताशी 56 किलोमीटर इतका आहे. त्याची रेंज 50 नॉटिकल मैल म्हणजेच 92.6 किलोमीटरची आहे.
‘कँडेला’चे सीईओ गुस्ताव हॅसेल्सकोग यांनी सांगितले की पाण्यावरून प्रवास करण्यासाठी हे एक क्रांतिकारक वाहन ठरू शकते. हे जहाज पाण्यावरून जणु काही ‘उडत’ असल्यासारखे जाते. त्यासाठी ते ‘हायड्रोफॉईल्स’चा वापर करते. त्यामुळे जहाज पाण्याच्या पृष्ठभागावर उचलले जाते. या हायड्रोफॉईल्समुळे पाण्याचा अवरोध कमी होतो व त्यामुळे सामान्य नौकांच्या तुलनेत जहाजाला चांगला वेग येतो. ‘पी-12’ मध्ये कॉम्प्युटर-गायडेड हायड्रोफॉईल्स आहेत.
The post जगातील पहिले इलेक्ट्रिक फ्लाईंग शिप appeared first on पुढारी.

स्टॉकहोम : सध्या उडत्या मोटारी, उडती टॅक्सी चर्चेचा विषय बनलेल्या असतात. आता जगातील पहिली इलेक्ट्रिक फ्लाईंग पॅसेंजर शिप चर्चेत आले आहे. या ‘उडत्या’ जहाजाने स्विडनमध्ये आपल्या चाचण्या यशस्वी केल्या आहेत. आता स्टॉकहोमच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत 2024 मध्ये समाविष्ट होण्यासाठी हे इलेक्ट्रिक फ्लाईंग शिप सज्ज झाले आहे. त्यासाठी त्याचे आता मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू होणार आहे. …

The post जगातील पहिले इलेक्ट्रिक फ्लाईंग शिप appeared first on पुढारी.

Go to Source