गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात दुपारी ३ वाजतापर्यंत ५४.९९ टक्के मतदान

गडचिरोली: पुढारी वृत्तसेवा : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजतापासून मतदानास सुरुवात झाली. दुपारी ३ वाजतापर्यंत ५४.९९ टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती निवडणूक विभागाने दिली. गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात गडचिरोली, अहेरी, आरमोरी आणि आमगाव या चार विधानसभा क्षेत्रात दुपारी ३ वाजतापर्यंत, तर ब्रम्हपुरी आणि चिमूर या विधानसभा क्षेत्रांमध्ये संध्याकाळी ६ …

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात दुपारी ३ वाजतापर्यंत ५४.९९ टक्के मतदान

गडचिरोली: Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजतापासून मतदानास सुरुवात झाली. दुपारी ३ वाजतापर्यंत ५४.९९ टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती निवडणूक विभागाने दिली.
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात गडचिरोली, अहेरी, आरमोरी आणि आमगाव या चार विधानसभा क्षेत्रात दुपारी ३ वाजतापर्यंत, तर ब्रम्हपुरी आणि चिमूर या विधानसभा क्षेत्रांमध्ये संध्याकाळी ६ वाजतापर्यंत मतदान होते.
सर्व सहाही मतदारसंघांमध्ये दुपारी ३ वाजतापर्यंत ५४.९९ टक्के मतदान झाले. रखरखत्या उन्हातही मतदारांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्याचे दिसून आले. संवेदनशिल तालुक्यांमध्ये पोलिसांचा चोख पहारा होता. सकाळी कुरखेडा येथील एका मतदान केंद्रावर ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्यानंतर दुसरी मशिन बोलावण्यात आली. त्यानंतर दोन तासांनी तेथे मतदानास सुरुवात झाली. सिरोंचा येथेही ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याने हेलिकॉप्टरने तेथे मशिन पाठविण्यात आल्या.
हेही वाचा 

Lok Sabha Election 2024 : गडचिरोली जिल्ह्यात चोख पोलिस बंदोबस्तात मतदान
Lok Sabha Election 2024 : भंडारा-गोंदिया, गडचिरोलीवरून राष्ट्रवादी नाराज; हक्काचे मतदारसंघ सोडावे लागले
छत्तीसगड सीमेवर गडचिरोली पोलिसांकडून नक्षल्यांचे शिबीर उध्वस्त