केजरीवाल तुरुंगात काय खातात? न्यायालय करणार तपासणी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा:  दिल्लीचे राउज अव्हेन्यू न्यायालय अरविंद केजरीवाल तुरुंगात काय खातात याची तपासणी करणार आहे. ईडीने केजरीवालांवर शुगर वाढवण्यासाठी तुरुंगात आंबे-मिठाई खात असल्याचे आरोप केले होते. याप्रकरणी दिल्लीच्या राउज अव्हेन्यू न्यायालयात शुक्रवारी (१९ एप्रिल) सुनावणी पार पडली. यामध्ये न्यायालयाने सांगितले की, “केजरीवालांना जे घरचे अन्न खायला मिळते त्यामध्ये ठरवून दिलेल्या डाएट चार्टचे अनुसरण …

केजरीवाल तुरुंगात काय खातात? न्यायालय करणार तपासणी

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा:  दिल्लीचे राउज अव्हेन्यू न्यायालय अरविंद केजरीवाल तुरुंगात काय खातात याची तपासणी करणार आहे. ईडीने केजरीवालांवर शुगर वाढवण्यासाठी तुरुंगात आंबे-मिठाई खात असल्याचे आरोप केले होते. याप्रकरणी दिल्लीच्या राउज अव्हेन्यू न्यायालयात शुक्रवारी (१९ एप्रिल) सुनावणी पार पडली. यामध्ये न्यायालयाने सांगितले की, “केजरीवालांना जे घरचे अन्न खायला मिळते त्यामध्ये ठरवून दिलेल्या डाएट चार्टचे अनुसरण केले जात आहे का? हे तपासावे लागणार आहे, असे म्हटले आहे.” (Arrest of Arvind Kejriwal)
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी तिहारच्या तुरुंगात आहेत. त्यांच्यावर ईडीने आरोप केले होते की, “ अरविंद केजरीवाल रक्तातील शुगरचे प्रमाण वाढण्यासाठी आंबे आणि मिठाई खात आहेत.” त्यानंतर आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी आरोप फेटाळून लावले. याप्रकरणीच शुक्रवारी (१९ एप्रिल) दिल्लीच्या राउज अव्हेन्यू न्यायालयात सुनावणी पार पडली. यामध्ये ईडीच्या आरोपांवर केजरीवालांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, “केजरीवालांना तुरुंगात केवळ एकदाच नवरात्रीचा प्रसाद म्हणून आलूपुरी देण्यात आली, त्याचबरोबर त्यांना देण्यात आलेला चहा हा शुगरफ्री आहे.” (Arrest of Arvind Kejriwal)
दरम्यान शुक्रवारी (१९ एप्रिल) सकाळी अरविंद केजरीवालांनी तुरुंगात इन्सुलिन आणि डॉक्टरांशी दररोज बातचीत करता यावी, याकरिता न्यायालयात याचिका दाखल केली. केजरीवालांचे म्हणणे आहे की, “जेव्हापासून ते तुरुंगात आले तेव्हापासून त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत आहे. त्यांना मधुमेहाचा त्रास आहे, हे आरोग्यासाठी घातक आहे.” त्यामुळे त्यांनी न्यायालयात इन्सुलिन आणि डॉक्टरांच्या सल्लामसलतीची मागणी केली. यामध्ये केजरीवालांनी तिहारच्या तुरुंगात इन्सुलिन आणि दररोज १५ मिनीटे दूरदृश्यप्रणालीद्वारे डॉक्टरांशी सल्लामसलत करता यावी याची मागणी केली. त्यांच्या याचिकेचा निकाल न्यायालयाने राखीव ठेवला. (Arrest of Arvind Kejriwal)
हेही वाचा:

Arvind Kejriwal: केजरीवालांच्या याचिकेवरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला, तुरुंग प्रशासन, ED ला नोटीस
Arvind Kejriwal : केजरीवालांचा तुरुंगात ‘छळ’ केला जातोय; आप नेते संजय सिंह यांचा दावा
Arvind Kejriwal ED Arrest | केजरीवालांना जेल की बेल?; सोमवारी होणार फैसला! ईडी अटकेविरोधातील याचिकेवर १५ एप्रिलला सुनावणी

Go to Source