नागपूर: बापरे..! मतदान केंद्रात निघाला साप

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : नागपूर लोकसभा मतदारसंघातील केडीके महाविद्यालयातील लोकसभा निवडणुकीच्या मतदान कक्ष क्रमांक 5 च्या बाहेर साप आल्याने गोंधळ उडाला होता. मतदानासाठी आलेल्या मोहनीश मोहाडीकर या युवकाने याविषयीची माहिती वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटीचे नितीश भांदककर यांना दिली. माहिती मिळताच नितीश भांदक्कर, रूपचंद वैद्य, लकी खलोडे हे हा साप पकडण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले. मतदान कक्षाच्या बाहेरील हिरवळीमध्ये 2.5 फूट लांबीचा विषारी साप आढळून आला. सापाला पकडून जंगलात सोडण्यात आले.
हेही वाचा
Lok Sabha Election 2024 – नागपूर : पहिल्या ४ तासात २० टक्क्यापर्यंत मतदान, गैरसोयीमुळे नागरिकांकडून तक्रारीचा पाढा
संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष; रामटेकमध्ये 2405 तर नागपूरमध्ये 2105 मतदान केंद्र
नागपूर : बांबुच्या बुथपासून मेट्रोच्या थीमपर्यंत 10 लक्षवेधी मतदान केंद्र
