हिंगोली: पूर्णा कारखाना मार्गावर दुचाकीचा अपघात; एकाचा जागीच मृत्यू

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा: पूर्णा सहकारी साखर कारखाना मार्गावर पूर्णेकडे जाणाऱ्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात एकजण जागीच ठार झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी व्यक्‍तीस उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले आहे. ही घटना गुरुवारी दुपारी ४ वाजण्या दरम्यान घडली. वसमत ते पूर्णा मार्गावर १८ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास हिंगोली येथून पूर्णेकडे …

हिंगोली: पूर्णा कारखाना मार्गावर दुचाकीचा अपघात; एकाचा जागीच मृत्यू

हिंगोली, Bharat Live News Media वृत्तसेवा: पूर्णा सहकारी साखर कारखाना मार्गावर पूर्णेकडे जाणाऱ्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात एकजण जागीच ठार झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी व्यक्‍तीस उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले आहे. ही घटना गुरुवारी दुपारी ४ वाजण्या दरम्यान घडली.
वसमत ते पूर्णा मार्गावर १८ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास हिंगोली येथून पूर्णेकडे जाणाऱ्या दुचाकीस अज्ञात वाहनाने उडविले. या अपघातात दुचाकीस्वार रिहान अनवर अहेमद (वय १८) हा जागीच मृत्यू पावला. तर इम्रान शेख अनवर हा गंभीर जखमी झाला. दोघे रा पुर्णा जि परभणी येथील आहेत. अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल काचमांडे, साहेबराव चव्हाण, अजय पंडित आदींनी धाव घेतली. गंभीर जखमीस पोलिसांनी नागरीकांची मदत घेत उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले.
इम्रानची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यावर वसमतच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले आहे.
हेही वाचा 

हिंगोली : बोल्‍डा फाटा येथे दुकानांना आग; १० दुकाने आगीच्या भक्षस्‍थानी
हिंगोली : कनेरगावनाका तपासणी नाक्यावर जीपमधून 15 लाखांची रोकड जप्त
हिंगोली : मतदानावरचा बहिष्कार मागे, पण आम्हाला धान्य वेळेवर मिळावे हीच विनंती; राजापूर ग्रामस्थांची मागणी