विश्व यकृत दिन विशेष : मद्यपानामुळे यकृताला ‘हा’ मोठा धोका
[author title=”प्रज्ञा सिंग-केळकर” image=”http://”][/author]
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : मद्यपान, चुकीची जीवनशैली, लठ्ठपणा अशा विविध कारणांमुळे यकृत निकामी होण्याचे प्रमाण वाढत आहे. मद्यपानामुळे होणार्या यकृताच्या आजाराचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. पुढील 10 वर्षांमध्ये फॅटी लिव्हरचा आजार अधिक प्रमाणात बळावणार असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे. यकृत प्रत्यारोपणाच्या 90 टक्के शस्त्रक्रिया यशस्वी होत असल्याचेही पाहायला मिळत आहे.
मद्यपानाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कॉर्पोरेट कल्चर, बदलती जीवनशैली, ताणतणाव यासारख्या अनेक कारणांमुळे लोक आजकाल मद्यपान करताना दिसतात. पण, केवळ अति प्रमाणात प्यायले जाणारे मद्यच नव्हे तर त्याच्या जोडीने खाल्ले जाणारे खारट, तळलेले, खूप प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ आणि धुम्रपान यामुळेदेखील यकृताला इजा पोहोचते. अधिक वेगाने आणि जास्त प्रमाणात मद्य प्यायल्याने येणारा हँगओव्हर हासुद्धा यकृतासाठी घातक ठरतो, अशी माहिती सह्याद्री हॉस्पिटल्समधील यकृत आणि बहु-अवयव प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख डॉ. बिपीन विभूते यांनी ‘Bharat Live News Media’च्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे प्रमाण आणि त्यात मिळणारे यश यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र, अजूनही उपचारपद्धतींचे शुल्क, रुग्ण आणि कुटुंबीयांवर येणारा तणाव, दात्यांची कमतरता, शस्त्रक्रिया झाल्यानंतर घ्यावयाची काळजी यासारख्या अनेक गोष्टींचा विचार रुग्णाला करावा लागतो. त्यामुळे चांगली जीवनशैली अनुसरून, त्याला ताजे घरी बनवलेले सकस अन्न आणि रोज 30-40 मिनिटे व्यायाम याची जोड दिल्यास आपले यकृत सद़ृढ राहाण्यास नक्कीच मदत होईल, असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.
हेही वाचा
रॅगिंगप्रकरणी ससूनच्या डीनचा अजब खुलासा; रॅगिंग प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?
नाशिकमध्ये चार दिवसांत दुसऱ्यांदा उच्चांकी पारा
विद्यार्थ्यांना खुशखबर! उन्हाळी सुटी 2 मे पासून