आषाढी पायी वारी सोहळा : संत श्रीज्ञानेश्वर महाराज पालखीचे 29 जूनला प्रस्थान
आळंदी : Bharat Live News Media वृत्तसेवा : आषाढी पायी वारीसाठी शनिवार, दि. 29 जून रोजी सायंकाळी 4 वाजता संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्याचे आळं येथून प्रस्थान होणार आहे. तर पालखी दशमीला मंगळवार, दि. 16 जुलै रोजी पंढरपुरात दाखल होणार असल्याची माहिती पालखी सोहळाप्रमुख योगी निरंजननाथ व आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप यांनी दिली. पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.18) पंढरपूर येथे पालखी सोहळा नियोजन बैठक पार पडली. या वेळी बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार, ह.भ.प. विठ्ठल महाराज वासकर, ह.भ.प. राणा महाराज वासकर, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, ह.भ.प. मारुती महाराज कोकाटे, ह.भ.प. भाऊ महाराज फुरसुंगीकर, देवस्थानचे प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, ह.भ.प. भाऊ महाराज गोसावी व इतर दिंडीप्रमुख उपस्थित होते.
शनिवार, दि. 29 जून रोजी सायंकाळी 4 वाजता श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी येथून प्रस्थान ठेवेल. रात्री आळंदीतच आजोळघरी गांधीवाडा दर्शनबारी मंडपात मुक्कामी राहील. रविवार, दि. 30 जून रोजी सकाळी आळंदीतून मार्गस्थ होईल व सायंकाळी पुण्यात मुक्कामी राहील. सोमवार, दि. 1 जुलै रोजीदेखील पालखी पुण्यातच मुक्कामी राहील. मंगळवार, दि. 2 व 3 जुलै रोजी सासवड (ता. पुरंदर) येथे 2 दिवस मुक्कामी असणार आहे. गुरुवार, दि. 4 जुलै रोजी जेजुरी, शुक्रवार, दि. 5 जुलै रोजी वाल्हे, शनिवार, दि. 6 व 7 जुलै रोजी लोणंद येथे दोन दिवस पालखी मुक्कामी राहील. येथे दुपारी माउलींचे निरा स्नान पार पडेल. त्यानंतर सोमवार, दि. 8 जुलै रोजी तरडगाव, मंगळवार, दि. 9 फलटण, बुधवार, दि. 10 जुलैला बरड, गुरुवार, दि. 11 जुलैला नातेपुते, शुक्रवार, दि. 12 जुलै रोजी माळशिरस, शनिवार, दि. 13 जुलैला वेळापूर, रविवार, दि. 14 जुलैला भंडीशेगाव, सोमवार, दि. 15 जुलै रोजी वाखरी, तर मंगळवार, दि. 16 जुलै रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पालखी सोहळा मुक्कामी पोहोचेल. बुधवार, दि. 17 जुलैला आषाढी एकादशीचा महासोहळा होईल.
हेही वाचा
बाप रे ! हडपसरचा पारा 43.5 अंशांवर; शहरात उन्हाच्या झळा वाढल्या
चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात पहिल्या दोन तासात 7.44 टक्के मतदान
नाशिकमध्ये चार दिवसांत पाऱ्याची दुसऱ्यांदा उच्चांकी पातळी, पारा ४०.७ अंशांवर