पुणे पुन्हा हादरलं! येरवड्यातील अग्रसेन शाळेसमोर तरुणावर गोळीबार
पुणे : पुण्यात आता कोयता गँगनंतर बंदूकबाजांनी डोकं वरती काढलंय… किरकोळ कारणातून देखील बार काढला जातोय. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक आहे की नाही असाच सवाल आता निर्माण झालायं .बेकायदा पिस्तूलं आणि त्यातून होणारे गोळीबार पोलिसांसाठी डोकं दुखी ठरू पाहतायत. शहरात चौथ्या दिवशीही गोळीबाराचं सत्र कायम आहे. आज शुक्रवारी पहाटे साडेतीन ते चार वाजताच्या सुमारास येरवडा येथील अग्रसेन शाळेसमोर एका तरुणावर गोळीबार करण्यात आला आहे.
तीन गोळ्या झाडण्यात आल्या असून एक गोळी तरुणाला लागल्याची माहिती आहे. पूर्वीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे समजते. विकी चांडिल्ये असे गोळीबार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर आकाश चांडिल्ये याने हा गोळीबार केलाय. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आकाश याच्यावर लोणावळा पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शहरातील गोळीबाराच्या घटना..
मंगळवारी दुपारी पावने दोन वाजता बांधकाम व्यवसायिकावर गोळीबाराचा प्रयत्न झाला. शिवाजीनगर जंगली महाराज रस्त…
बुधवारी सकाळी हडपसर येथे व्यवसायिक स्पर्धेतून एका माजी सैनिकाने दुसऱ्या माजी सैनिकावर गोळ्या झाडल्या.
गुरुवारी पहाटे भुमकर चौक येथे माचीस मागीतल्या कारणातून दोघांवर गोळीबार
हेही वाचा
नाशिकमध्ये चार दिवसांत पाऱ्याची दुसऱ्यांदा उच्चांकी पातळी, पारा ४०.७ अंशांवर
पैठण : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीचे अपहरण
T20 World Cup : विराट कोहली टी-20 वर्ल्डकपमध्ये देणार ‘सलामी’?