आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
चिराग दारूवाला :
चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
मेष : श्रीगणेश म्हणतात की, आज इच्छीत कार्य पूर्ण झाल्याने मन प्रसन्न राहील. नवीन योजना राबविण्यासाठी कुटुंबाचे सहकार्यही मिळेल. मात्र स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आणखी प्रयत्न करावे लागतील. वाहनाशी संबंधित कर्ज घेण्याबाबत विचार कराल. नवीन काम सुरू होईल. पती-पत्नीचे संबंध मधूर राहतील.
वृषभ : आर्थिकदृष्ट्या काळ उत्तम आहे. आध्यात्मिक कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या सहवासात राहिल्याने तुम्हाला मनःशांती मिळेल. मुलांच्या करिअरशी संबंधित कोणतीही माहिती मिळाल्याने घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. तुमच्यावर जबाबदाऱ्या अधिक असतील. आज पैसे गुंतवुकीसाठी वेळ अनुकूल नाही. कोणाशीही वादात पडू नका, अशी सूचना श्रीगणेश करतात. कार्यक्षेत्रात सहकारी आणि कर्मचाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल.
मिथुन : आज कर्मावर विश्वास ठेवून महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. मनःशांतीचा अनुभव घ्याल. करिअरवर पूर्ण लक्ष केंद्रीत केल्याने तरुण यशस्वी होतील. राग आणि हट्टीपणा यांसारख्या नकारात्मक गोष्टींमुळे दैनंदिन दिनचर्या खराब होऊ शकते. निष्काळजीपणामुळे खर्च वाढू शकतो, अशी सूचना श्रीगणेश करतात. व्यवसायात कोणताही नवीन प्रयोग करणे फायदेशीर ठरेल.
कर्क : आज दैनंदिन कामांतून आराम मिळवण्यासाठी आध्यात्मिक ठिकाणी वेळ घालवण्याचा प्रयत्न कराल. त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल. आर्थिक स्थितीकडे लक्ष द्या. आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका, असा सल्ला श्रीगणेश देतात. खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यवसायाची स्थिती सामान्य राहील. घरातील वातावरण सुख-शांतीपूर्ण राहील. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी राहाल.
सिंह : काही काळासाठी योजलेले ध्येय साध्य करण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे श्रीगणेश सांगतात. तुम्हाला भावनिकदृष्ट्या सशक्त वाटेल. समस्यांवर उपाय सापडतील. मात्र घाईगडबडीत घेतलेले निर्णय बदलावे लागतील. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. आर्थिक स्थिती सुरळीत ठेवण्यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. व्यवसायात अपेक्षित परिणाम मिळू शकतात.
कन्या : श्रीगणेश म्हणतात की, आज अडचणी आणि अडथळ्यांशिवाय तुम्ही तुमची महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. विशेष आवडीच्या कार्यातही आनंददायी वेळ घालवता येईल. चुकीच्या वादात पडू नका. तुमच्या वैयक्तिक कामांवरच लक्ष केंद्रीत करा. कार्यक्षेत्रात इतरांवर अवलंबून राहू नका. स्वतःच्या प्रयत्नाने कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
तूळ : आज कौटुंबिक जबाबदाऱ्या घरातील सदस्यांमध्ये विभागून स्वत:साठी थोडा वेळ द्या. एखाद्या खास व्यक्तीशी झालेल्या भेटीमुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडून येतील, असे श्रीगणेश सांगतात. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात थोडा वेळ घालवा. मेहनतीनुसार तुम्हाला योग्य फळ मिळेल. गुंतवणूक किंवा बँकिंगशी संबंधित कामे काळजीपूर्वक करा. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. कुटुंबातील सदस्याच्या तब्येतीची चिंता राहील.
वृश्चिक : आज तुमचे विवेकशील विचार तुम्हाला योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देतील. दिनचर्या अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सांभाळाल. तरुणांना यशासाठी अधिक मेहनत करावी लागेल. काही वेळा शिस्तीबाबतचा तुमचा अति आग्रह इतरांसाठी त्रासदायक ठरेल, असे श्रीगणेश सांगतात.
धनु : महत्त्वाचे काम नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण केल्याने मानसिक शांती मिळेल, असे श्रीगणेश सांगतात. विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासात यश मिळेल. नकारात्मक आणि परस्परविरोधी कृती करणाऱ्या लोकांपासून सावध राहा. महिलांनी त्यांच्या प्रतिष्ठेबद्दल अधिक जागरूक राहावे. व्यवसायाशी संबंधित परिश्रमांना योग्य फळ मिळेल. कार्यालयातील लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी महत्त्वपूर्ण अधिकार प्राप्त होतील.
मकर : काही काळापासून सुरू असलेली कोणतीही समस्या जवळचे नातेवाईक आणि कुटुंबियांच्या मदतीने सोडवली जाईल, असे श्रीगणेश सांगतात. सामाजिक उपक्रमांमध्ये तुमचा सहभाग राहील. वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवा. कोणतीही गुंतवणूक करण्यासाठी वेळ अनुकूल नाही. लहान-मोठे निर्णय घेताना योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घेवूनच अंतिम निर्णय घ्या. आज व्यवसायात साधेपणा आणि गांभीर्याची गरज आहे.
कुंभ : आज महत्त्वाच्या कामात यश मिळेल. महिलांसाठी काळ अनुकूल आहे. त्यांच्या कार्यांबद्दल जागरूकता त्यांना यश देईल. विद्यार्थ्यांना कोणत्याही मुलाखतीत किंवा स्पर्धेत यश मिळण्याची शक्यता आहे. काहीवेळा लहानसहान गोष्टींवरून तुमची चिडचिड घरातील वातावरण गोंधळात टाकते. निष्क्रिय कामांमध्ये स्वतःला गुंतवू नका, असा सल्ला श्रीगणेश देतात. आजूबाजूच्या व्यावसायिकांशी सुरू असलेल्या स्पर्धेत काही प्रमाणात यश मिळू शकते.
मीन : कुटुंबातील सदस्याच्या विवाहाशी संबंधित नातेसंबंधांमुळे आनंदी वातावरण असेल, असे श्रीगणेश सांगतात. मुलाखतीतील यशामुळे तरुणांचा आत्मविश्वास वाढेल. घाईगडबड टाळा. अन्यथा कामात चुका राहतील. तुमची ऊर्जा सकारात्मक बाबींकडे वळवा. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. अज्ञाताची भीती किंवा चिंता राहील.