पैठण : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीचे अपहरण

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण शहरात अल्पवयीन तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून अपहरण व पाठलाग करुन छेडछाडीच्या दोन घटना घडल्या असून या प्रकरणी पैठण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पैठण शहरातील एका परिसरातील १४ वर्षीय अल्पवयीन तरुणीचे बुधवारी (दि. १७) रोजी यश घोडके (रा. साठेनगर, पैठण) याने लग्नाचे आमिष दाखवून …

पैठण : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीचे अपहरण

पैठण; Bharat Live News Media वृत्तसेवा : पैठण शहरात अल्पवयीन तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून अपहरण व पाठलाग करुन छेडछाडीच्या दोन घटना घडल्या असून या प्रकरणी पैठण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पैठण शहरातील एका परिसरातील १४ वर्षीय अल्पवयीन तरुणीचे बुधवारी (दि. १७) रोजी यश घोडके (रा. साठेनगर, पैठण) याने लग्नाचे आमिष दाखवून व वाईट हेतूने वारंवार पाठलाग करून अपहरण केल्याची तक्रार पीडित तरुणीच्या आईने पैठण पोलीस ठाण्यात दाखल केली. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी अपहरण करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सपोनि जनाबाई सांगळे करीत आहे.
दुसऱ्या घटनेत पैठण शहरातील एका १४ वर्षीय मुलीचा वारंवार पाठलाग करून छेडछाड करीत असल्यामुळे पीडित मुलीच्या आईने तक्रार दाखल केल्यामुळे अदनान चाॅंद शेख (रा. नेहरू चौक पैठण) याच्या विरुद्ध पोलीस निरीक्षक संजय देशमुख, सपोनि सिद्धेश्वर गोरे यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सिद्धेश्वर भोरे हे करीत आहे.