लेखक शेखर कपूर यांचा संगीतकार डेव्ह स्टीवर्टसोबतचा फोटो व्हायरल
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : चित्रपट निर्माते शेखर कपूर आणि युरिथमिक्सचे संगीतकार डेव्ह स्टीवर्ट यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे दोघे सोबत काम करणार का? असा प्रश्न नेटकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. चित्रपट निर्माते शेखर कपूर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पुरस्कार विजेते संगीतकार डेव्ह स्टीवर्ट सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. आता हे दोघे एकत्र काम करणार का? हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.
शेखर कपूर आणि स्टीवर्टसोबत गप्पा मारताना हा फोटो आला आहे. स्टीवर्ट जो अतिशय लोकप्रिय पॉप बँड युरिथमिक्सचा अर्धा भाग आहे. त्याने त्याच्या सोशल मीडियावर ” ऑन जर्नी विथ शेखर कपूर ” अस कॅप्शन देऊन फोटो शेअर केला आहे. कॅप्शन बघून असं कळतंय की, लेखक आणि ग्रॅमी-विजेता संगीतकार प्रेक्षकांना भारतीय सिनेमा तसेच संगीताभोवती काहीतरी काम करत आहेत.
डेव्ह स्टीवर्ट सध्या त्यांच्या यूके दौऱ्याची वाट पाहत आहेत, जे या वर्षी ११ जुलैपासून सुरू होणार आहे. तर शेखर कपूर त्यांच्या १९८३ मध्ये दिग्दर्शित पदार्पण ‘मासूम’ च्या सिक्वेलसाठी तयारी करत आहे. ज्यामध्ये नसीरुद्दीन शाह आणि शबाना आझमी मुख्य भूमिकेत होते. मासूम…द न्यू जनरेशन’ नावाचा सिक्वेल कधी येणार आता हे बघणं उत्सुकतेच ठरणार आहे.