जागतिक वारसा दिन : मुंबई… प्राचीन वास्तूंचे माहेरघर अन्…

मुंबई : राजेश सावंत :  मुंबई महापालिका मुख्यालय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मध्य रेल्वेचे मुख्यालय, हायकोर्ट, राजाबाई टॉवर, म्युझियम, विद्यापीठ, जनरल पोस्ट ऑफिस, आदी पुरातन वास्तुसह दक्षिण मुंबईत सुमारे 400 पेक्षा जास्त पुरातन वास्तू आहेत. त्याशिवाय ब्रिटिश कालीन हॉर्निमन सर्कल, फ्लोरा फाउंटन, 156 वर्षीय फिटझ्गेराल्ड कारंजा, राणी बागेतील विविध पुतळे, मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी उभारलेले …

जागतिक वारसा दिन : मुंबई… प्राचीन वास्तूंचे माहेरघर अन्…

मुंबई : राजेश सावंत :  मुंबई महापालिका मुख्यालय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मध्य रेल्वेचे मुख्यालय, हायकोर्ट, राजाबाई टॉवर, म्युझियम, विद्यापीठ, जनरल पोस्ट ऑफिस, आदी पुरातन वास्तुसह दक्षिण मुंबईत सुमारे 400 पेक्षा जास्त पुरातन वास्तू आहेत. त्याशिवाय ब्रिटिश कालीन हॉर्निमन सर्कल, फ्लोरा फाउंटन, 156 वर्षीय फिटझ्गेराल्ड कारंजा, राणी बागेतील विविध पुतळे, मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी उभारलेले प्याऊ पाहिल्यावर मुंबईला प्राचीन वास्तूचे माहेरघरच म्हणावे लागेल.
मुंबईवर ब्रिटिशांनी अनेक वर्षे राज्य केले. लंडन व मुंबईची तुलना केल्यास दोन्ही शहरांतील इमारतींची रचना जवळपास सारखीच आहे. मुंबईतून ब्रिटिश गेले, मात्र त्यांनी उभारलेल्या इमारती व अनेक वास्तू आजही जैसे थे आहेत. हिंदी व मराठी चित्रपटात दाखवण्यात येणारे पूर्वीचे बोरीबंदर म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनस व आताची सीएसएमटी येथील विविध नक्षीने सजलेले मुख्यालय अनेकदा पाहिले असेल. याच मुख्यालयाच्या बाजूला मुंबई महापालिकेचे मुख्यालय आहे. या दोन्ही इमारती 1893 पूर्वी बांधल्या आहेत. या इमारती पाहण्यासाठी सेल्फी पॉइंटही बनवण्यात आला आहे. या इमारतीला साजेसा असा परिसरही बनवण्यात आला आहे.
या परिसराला हेरिटेज लूक दिलेला असून, येथील स्ट्रीट लाईट, पदपथ इमारतीला शोभतील असेच बनवलेले आहेत. आजूबाजूलाही अनेक ब्रिटिशकालीन इमारती असून, त्यांचे वयोमानही सव्वाशे वर्षांपेक्षा जास्त आहे. अनेक वास्तूंना हेरिटेज दर्जा दिल्याने या वास्तूंचे वैभव कायम राहणार आहे. ब्रिटिशांची छाप असलेल्या या शहराने वैभव हरवू नये, यासाठी पुरातन वास्तु विभागासह महापालिकेनेही पुरातन वास्तूंच्या जतनासह परिसराला हेरिटेज लुक देण्यावर भर दिला आहे. यासाठी 100 ते 150 कोटी रुपयांवर निधी खर्च केला जाणार आहे.
156 वर्षीय फिटझ्गेराल्ड कारंजा
मुंबईमध्ये 1867 ते 1872 या काळात सेमूर फिटझ्गेराल्ड गव्हर्नर होते. त्यांच्या स्मरणार्थ 40 फूट उंच आणि 19 फूट रुंद कारंजा उभारण्यात आला. हा कारंजा मेट्रो सिनेमा चौकात आहे. इंग्लंडमधील कारंजाप्रमाणेच नॉर्थहेम्प्टन येथील बारवेल अ‍ॅण्ड कंपनीच्या ईगल फाउंड्रीमध्ये ओतीव लोखंडापासून हा कारंजा तयार करण्यात आला. जगभरात असे दोनच कारंजे होते. त्यापैकी एक इंग्लडमध्ये तर दुसरा मुंबईत होता. मात्र, इंग्लंडचा कारंजा कालौघात इतिहासजमा झाला आहे.
150 वर्षीय हॉर्निमन सर्कल
दक्षिण मुंबईतील एशियाटिक लायब्ररीसमोरील मोकळया भूखंडावर 1872 मध्ये म्हणजेच 150 वर्षांपूर्वी उभारलेला हॉर्निमन सर्कल आजही जैसे थे आहे. हा परिसर पाहण्यासाठी आजही हजारो लोक या ठिकाणी भेट देतात. या हॉर्निमन सर्कलच्या जमिनीखाली सुमारे दीड फूट गाडल्या गेलेल्या कुंपण भिंतीचा ढाचा पूर्ववत केला जाणार आहे. यासाठी तब्बल 16 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
भाऊ दाजी लाड संग्रहालय
राणीबागेच्या आवारात बाबू दाजी लाड वस्तू संग्रहालय आहे. मुंबईचा इतिहास व संस्कृतीची ओळख करून देणार्‍या या संग्रहालयाची दखल ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने घेतली आहे. पर्यटकांसाठी महत्त्वाच्या अशा मुंबईतील पाच ठिकाणांत ही वास्तू येते. मुंबईचा इतिहास, भूगोल, साहित्य, लोकजीवन, कलाकृती यांचा संगम येथे दिसतो. लॉर्ड हार्डिग्स (गव्हर्नर जनरल अपोलो बंदर, मुंबई), लॉर्ड सँडहर्स्ट (गव्हर्नर जनरल, एस्प्लेनेड, मुंबई), क्वीन व्हिक्टोरिया (ब्रिटनची राणी, फोर्ट) असे अनेक पुतळे संग्रहालयाबाहेर आहेत.
फाउंटन..
दक्षिण मुंबईतील अनेक फाउंटनची दुरवस्था झाल्याच्या तक्रारींत वाढ झाली होती. येथील बहुतांश फाउंटन हे हेरिटेज वास्तूमध्ये मोडत असल्यामुळे या फाउंटनच्या दुरवस्थेमुळे दक्षिण मुंबईतील सौंदर्यकरणात बाधा येत आहे. त्यामुळे पालिकेने तातडीने दखल घेत या फाउंटन व शिल्पाच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेतले आहे. यात फ्लोरा फाउंटनची डागडुजी याआधीच करण्यात आली असून, या फ्लोरा फाउंटनची निर्मिती