मतदान न केल्यास खात्यातून 350 कट?
नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या असतानाच मतदानासंदर्भातील एका कथित वृत्ताने लक्ष वेधून घेतले आहे. मतदानाचा हक्क न बजावल्यास आपल्या खात्यातून 350 रुपये कापून घेण्यात येणार आहेत.
आपले बँकेत खाते नसल्यास मोबाईल रिचार्जवेळी ही रक्कम कट करण्यात येणार असल्याचे वृत्त पसरले आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोने अशा प्रकारचे वृत्त निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाने असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे फॅक्ट चेकमधून समोर आले आहे.