स्वदेस, गंगाजल चित्रपटांनाही वाईतील मेणवलीची भूरळ, साताऱ्यातील ‘या’ ठिकाणांना एकदा भेट द्याचं!

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनेक बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांच्या शूटिंगसाठी प्रसिद्ध असलेले वाई हे साताऱ्यातील प्रसिद्ध ठिकाण आहे. येथील प्राचीन महादेवाच्या मंदिराबद्दल आणि या ठिकाणाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. (Satara Wai Places Explore) सोबतच जवळपसाच्या अनेक ठिकाणांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. (Satara Wai Places Explore) चित्रपट निर्माता रोहित शेट्टीचा आगामी चित्रपट सिंघम थ्री चे शूटिंग …
स्वदेस, गंगाजल चित्रपटांनाही वाईतील मेणवलीची भूरळ, साताऱ्यातील ‘या’ ठिकाणांना एकदा भेट द्याचं!

स्वालिया शिकलगार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अनेक बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांच्या शूटिंगसाठी प्रसिद्ध असलेले वाई हे साताऱ्यातील प्रसिद्ध ठिकाण आहे. येथील प्राचीन महादेवाच्या मंदिराबद्दल आणि या ठिकाणाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. (Satara Wai Places Explore) सोबतच जवळपसाच्या अनेक ठिकाणांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. (Satara Wai Places Explore)

चित्रपट निर्माता रोहित शेट्टीचा आगामी चित्रपट सिंघम थ्री चे शूटिंग वाईच्या गणपती मंदिर परिसरात होणार असल्याचे समजते. यापूर्वी इथे राम तेरी गंगा मैली, गुंज उठी शहनाई, इश्किया, दबंग, सरगम यासारख्या चित्रपटांचे शूटिंग झाले आहे. त्यामुळे ‘वाई’ ही ‘फिल्मसिटी’च झाली आहे. अनेक चित्रपट, मालिका, भोजपूरी, वेब सीरीज यांचे शूटिंग इथे झाले आहे.

सातारा जिल्ह्यातील श्री तीर्थक्षेत्र आणि दक्षिण काशी म्हणून वाईला ओळखले जाते. येथील कृष्णा नदी, मेणवली घाट आणि तीरावरील मेणवलेश्वर मंदिर, ढोल्या गणपतीचे मंदिर आणि नाना फडणवीसांचा वाडा अशी प्रसिद्ध ठिकाणे आहेत. अमेक मराठी आणि बॉलिवूड चित्रपटांचे शूटिंग याठिकाणी झाले आहे. शाहरुखचा स्वदेस असो वा अजय देवगनचा गंगाजल अशा अनेक चित्रपटांना देखील येथील मेणवली घाटाची भूरळ पडली आहे.

पाहण्यासारखे मेणवलेश्वर महादेव मंदिर  
मेणवली हे ठिकाण वाईतील कृष्णा नदी काठी असलेले सुंदर ठिकाण आहे. नदी घाट चंद्रकोर आकाराचा आहे. प्राचीन मेणवलेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. मंदिराची रचना खूप आकर्षक आहे. काळ्या दगडी बांधकामातील मंदिर पटकन लक्ष वेधून घेणारे असून नीरव शांतता, घंटानाद आणि वाहते पाणी लक्ष वेधून घेणारे आहे. घाटावर दोन मोठी मंदिरे असून त्यापैकी एक महादेवाचे  मेणवलेश्वराचे मंदिर आहे. दुसरे ढोल्या गणपतीचे मंदिर आहे. सोबत आजूजाजूला छोटी मंदिरे देखील पाहायला मिळतात. घटावरील एका छोट्या मंदिरात मोठी धातूची घंटा अडकवलेली दिसते.

चित्रपटांना मेणवली घाटाची भुरळ
वाईतून आत एन्ट्री केल्यानंतर काही किलोमीटर अंतरावर मेणवली घाट असून इथे अनेक चित्रपटांचे शूटिंग झाले आहे. महत्त्वाचे अनेक बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांचे शूटिंग नदी काठावरील मेणवली घाटावर झाले आहे. स्वदेस, गंगाजल, चेन्नई एक्सप्रेस, दबंग, दबंग-२, देऊळ, बोल बच्चन, सिंघम, ओमकारा आदी. (Satara Wai Places Explore)
ऐतिहासिक ठिकाण
चित्रपटांशिवाय या ऐतिहासिक ठिकाणी प्री-वेडिंग फोटोसाठी उत्तम ठिकाण आहे.

आणखी काय पाहाल?
मेणवली गावात पेशवा नाना फडणवीस यांचा गढीचा वाडा आहे. सिद्धेश्वर मंदिर आणि संजीवन समाधी, गंगा रामेश्वर, रोकडोबा हनुमान मंदिर, काशी विश्वनाथ, लक्ष्मी नारायण, भृगू ऋषींची समाधी. वाईपासून जवळच ही समाधी आहे.

ढोल्या गणपती मंदिर –
कृष्णा नदीच्या तीरावर अनेक घाट आणि प्राचीन मंदिरांपैकी एक ढोल्या गणपतीचे मंदिर आहे. सरदार रास्ते यांनी १७६२ मध्ये एकाच दगडातून घडविलेली ढोल्या गणपतीची भव्यमूर्ती येथे आहे. यास महागणपती असेही म्हटले जाते. गाभार्‍यात गणपतीची पाषाणाची ६ फूट व लांबी ७ फूट अशी बैठकी मूर्ती आहे. ही मूर्ती नजरेत भरणारी आहे.

पावसाळ्यात जा या ठिकाणी
मेणवली, चिखली, मुगाव, पसरणी, धोम या गावांचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासारखे आहे. पावसाळ्यात याठिकाणी जाणे एक वेगळीच मजा आहे.
Laxmi Narasimha Temple dhom
धोम
धोम येथे कृष्णा नदीच्या काठावर बांधलेलं महादेवाचं मंदिर पाहण्यासारखं आहे. लक्ष्मी-नरसिंह मंदिर पाहण्यासारखं आहे. धोम धरणदेखील इथेच आहे.

कसे जाल?
वाईपासून ९ कि.मी. अंतरावर हे मंदिर आहे.

वैराटगड-
वैराटगड हा वाई शहराच्या आग्नेय दिशेला असून गडावर शंकर दत्त आणि मातंगी देवी मंदिरे आहेत.
काशीविश्वेश्वर मंदिर
कसे जाल?
वाईपासून ८ कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे.

काळूबाई मंदिर, मांढरदेव – 
डोंगराच्या पठारावर मांढरदेव गावात काळूबाईचे खूप जुने मंदिर आहे.

कसे जाल?
वाईपासून १६ किमी. अंतरावर हे मंदिर आहे.
मेणवली घाटावरील एक मंदिर
 
ढोल्या गणपती मंदिर
हेदेखील वाचा –

Konkan-Vengurla Tourism : गर्द झाडीतल्या आरवली, मोचेमाडला नक्की जा!
Konkan Coastal Tourism : कऱ्हाटेश्वर, नांदिवडे अन्‌ जयगडला जा फिरायला
Maharashtra Tourism : ‘निसर्गराजा कड्यावरच्या गणपती’ला कधी भेट दिलीय का?
Historical Tourism : कडक उन्हाळ्याआधी फिरुन ‘या’ ही सुंदर ठिकाणे
Ratnagiri best Tourism : राजापुरात पाहायला जा ‘ही’ अद्भूत ठिकाणे
Kolhapur-Sangli Ramling Temples : कोल्हापुरातील ‘या’ रामलिंग मंदिरांना भेट दिलीय का?
Raigad Explore : जिजाऊंचे पाचाड-शिवरायांच्या रायगडला गेला का?
Konkan Devbag Explore : ‘देवबागच्या मिनी केरळ’ला गेलात का?
Unexplored Konkan : वालावल, नेरुर अन् निवती खुणावतोय!
Unexplored Konkan : कोकणात दडलीय ही सुंदर ठिकाणे, तुम्ही पाहिली का?
Discover Konkan : कोणार्कचं नव्हे तर कोकणातही आहे अप्रतिम सूर्यमंदिर!
Mahashivratri Murudeshwar : मुरुडेश्वरला कधी गेलाय का? नक्की प्लॅन करा