Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Narayan Rane | रत्नागिरी- सिंधुदुर्गमधून नारायण राणेंना भाजपची उमेदवारी जाहीर, शिंदेंच्या शिवसेनेने दावा सोडला
रत्नागिरी, Bharat Live News Media वृत्तसेवा : रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघातून (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha) नारायण राणे (Narayan Rane) यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे रत्नागिरी- सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत असा सामना होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेने रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपला सोडली आहे. नारायण राणे हेच रत्नागिरी- सिंधुदुर्गचे उमेदवार असतील, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी अखेर भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या रुपाने महायुतीचा उमेदवार जाहीर केला आहे. या मतदारसंघाकडून निवडणूक लढवण्याची तयारी करणारे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी थांबण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शुक्रवारी केंद्रीय मंत्री राणे मोठे शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी पत्र काढून रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव जाहीर केले. नाव जाहीर होताच काही क्षणातच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्यांनी हे पत्र व्हायरल करीत स्टेटसवर ठेवले. भाजपच्या गोठात यामुळे उत्साहाचे वातावरण आहे.
रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे निवडणुकीसाठी इच्छूक होते. परंतु त्यांनी थांबण्याचा निर्णय घेतला आहे. महायुती म्हणून सर्व शक्तीनिशी नारायण राणे यांना विजयी करु, असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यानंतर मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
Maharashtra: BJP announces Union Minister Narayan Rane as its candidate from Ratnagiri Sindhudurg Lok Sabha seat.#LokSabhaElections2024 pic.twitter.com/coL2BbGCOo
— ANI (@ANI) April 18, 2024
हे ही वाचा :
Lok Sabha elections 2024 : पहिल्या टप्प्यातील काँग्रेसच्या प्रचाराकडे ठाकरे, पवारांची पाठ
अत्याचारांना सर्वसामान्यांना बळी पडू द्यायचे नाही – करण पवार
कोकणातील गरिबी, बेरोजगारी दूर करणे हे माझे ध्येय – नारायण राणे