जळगाव : मोरया केमिकल कंपनीतील आगीत 20 जखमी तर 1 ठार
जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा
येथील मोरया गॉगल कंपनीत बुधवार (दि.१७) आज सकाळी नऊ वाजता आग लागली. या आगीमध्ये 20 जण जखमी झाले आहेत. यामध्ये एक व्यक्ती कर्मचारी मृत झाल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयांकडून मिळाली आहे. समाधान पाटील या कामगाराचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे. कंपनीमधील आग विझवण्यासाठी संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून अग्निशामक बंब पाचारण करण्यात आलेले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवळपास तब्बल ४० ते ४५ अग्निशामक बंब लागले.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, शहरातील एमआयडीसी सेक्टर मधील मोरया केमिकल कंपनीत बुधवार (दि.१७) आज रोजी सकाळी ९ वाजता केमिकल कंपनीत भीषण आग लागली. दरम्यान आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर औद्योगिक वसाहत मधील अग्निशमन बंब, महानगरपालिकेचा अग्निशमन बंब, भुसावळ जामनेर जळगाव व जैन हिल्स येथील अग्निशमन बंब असे ३ ते ४ अग्निशमन बंब घटनांसाठी दाखल झाले. आग विजण्यासाठी तब्बल ४० ते ४५ बंब लागले आहेत. यावेळी कंपनीच्या लागलेल्या आगीतून धुराचे मोठे लोळ बाहेर पडताना दिसत होते. याआगीत सकाळच्या शिफ्टमध्ये काम करणारे २० हून अधिक कामगार गंभीररित्या भाजले गेले आहेत.
मोरया ग्लोबल कंपनीत लागलेल्या आगीत जखमी झालेले रुग्ण सारा हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले असून या ठिकाणी एकुण १७ जण जखमी दाखल आहेत. त्यापैकी ५ जण हे शासकीय रुग्णालय उपचारासाठी दाखल केले आहेत. सहा रुग्ण हे ७० ते ९० टक्के भाजले आहेत.
७० ते ९० टक्के गंभीर जखमींची नावे…
हेमंत गोविंद भंगाळे (रा. मुक्काम प्रभात कॉलनी), मयूर राजू खंगार (रा. जुना खेडी रोड), गोपाळ आत्माराम पाटील (रा. विखरण (अयोध्या नगर), सचिन श्रावण पाटील (रामेश्वर कॉलनी), दीपक वामन सुपा (विठोबा नगर (कालिंका माता), किशोर दत्तात्रय चौधरी (रामेश्वर कॉलनी,सिविल हॉस्पिटल), चंद्रकांत लक्ष्मण पाटील (रामेश्वर कॉलनी), नंदू छगन पवार, आनंद जगदेव, फिरोज तडवी (सर्व राहणार रामेश्वर कॉलनी), कपिल राजेंद्र पाटील, गणेश रघुनाथ सोनवणे (रा.सुप्रीम कॉलनी), चंद्रकांत दशरथ घोडेश्वर (रा.रामेश्वर कॉलनी), विशाल रवींद्र बारी (रा.जुने जळगाव), भिकन पुंडलिक खैरनार (रा.इच्छा देवी जवळ), जगजीवन अनंत परब (रा.अयोध्या नगर). नवाज अमीर तडवी, अशोका किराणा रमेश, अजमल पवार (रा.रामेश्वर कॉलनी) यांना भरती करण्यात आलेल्या यांच्यावर औषध उपचार सुरू आहे.
घटनास्थळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पाहणी केली व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर नामदार गिरीश महाजन, आमदार आजोबा उघडे, स्मिता वाघ, मनसेचे पदाधिकारी यांनी घटनास्थळी व सिविल हॉस्पिटल येथे भरती असलेल्या रुग्णांची चौकशी केली.
हेही वाचा:
जळगाव : केमिकल कंपनीला भीषण आग, २० पेक्षा जास्त कामगार जखमी तर पाच जण गंभीर
नंदुरबार : “तु मनी संग लगीन ना करनी तर…मी तुला मारी टाकसु” धमकवल्याने तिचा जीवनप्रवास थांबला
प्रियकराने जीवन संपवले : उच्च न्यायालयाचे निरीक्षण, “तरुणीला जबाबदार…”