प्रियकराने जीवन संपवले : उच्‍च न्‍यायालय म्‍हणाले, “तरुणीला जबाबदार…”

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : एखाद्या प्रियकराने प्रेमभंगातून जीवन संपवले असेल तर तरुणीने त्‍याला जीवन संपविण्‍यास प्रवृत्त केले आहे, असे म्हणता येणार नाही. या प्रकरणाला तरुणी जबाबदार आहे असा ठपका ठेवता येणार नाही, असे स्‍पष्‍ट करत दिल्ली उच्च न्यायालयाने  तरुणीसह एकाला अटकपूर्व जामीन मंजूर केला. प्रेम संबंधामधील अपयशामुळे एका तरुणाने जीवन संपवले होते. या प्रकरणी एका … The post प्रियकराने जीवन संपवले : उच्‍च न्‍यायालय म्‍हणाले, “तरुणीला जबाबदार…” appeared first on पुढारी.
प्रियकराने जीवन संपवले : उच्‍च न्‍यायालय म्‍हणाले, “तरुणीला जबाबदार…”


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : एखाद्या प्रियकराने प्रेमभंगातून जीवन संपवले असेल तर तरुणीने त्‍याला जीवन संपविण्‍यास प्रवृत्त केले आहे, असे म्हणता येणार नाही. या प्रकरणाला तरुणी जबाबदार आहे असा ठपका ठेवता येणार नाही, असे स्‍पष्‍ट करत दिल्ली उच्च न्यायालयाने  तरुणीसह एकाला अटकपूर्व जामीन मंजूर केला.
प्रेम संबंधामधील अपयशामुळे एका तरुणाने जीवन संपवले होते. या प्रकरणी एका पुरषासह एक तरुणीवर गुन्‍हा दाखल झालाहोता. या दोघांनी अटकपूर्व जामीनासाठी दिल्‍ली उच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली होती. यावर एकल खंडपीठाचे न्यायमूर्ती अमित महाजन यांच्‍या समोर सुनावणी झाली.
एखाद्याच्‍या चुकीच्या निर्णयासाठी दुसऱ्याला दोष देता येणार
न्‍यायमूर्ती अमित महाजन यांनी स्‍पष्‍ट केलेकी, कमकुवत मानसिकतेच्या माणसाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयासाठी, दुसऱ्या व्यक्तीला जीवन संपवण्‍यास प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवता येणार नाही. त्‍याने घेतलेल्‍या चुकीच्या निर्णयासाठी दुसऱ्या व्यक्तीला दोष देता येणार नाही. जर एखाद्या प्रियकराने प्रेमभंगातून, एखाद्या विद्यार्थ्याने परीक्षेत आलेल्‍या अपयशामुळे तर एखाद्या ग्राहकाने त्याचा खटला फेटाळल्यामुळे जीवन संपवले म्‍हणून अनुक्रमे तरुणी, परीक्षक, वकील यांनी त्‍यांना जीवन संपविण्‍यासाठी प्रोत्साहन दिले आहे, असे गृहीत धरता येणार नाही, असे निरीक्षणही न्यायमूर्ती अमित महाजन यांनी नोंदवत या प्रकरणी दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.

If A Lover Commits Suicide Due To Love Failure, Lady Cannot Be Held For Abetment Of Suicide: Delhi High Courthttps://t.co/xPtaie4yba
— Live Law (@LiveLawIndia) April 17, 2024

The post प्रियकराने जीवन संपवले : उच्‍च न्‍यायालय म्‍हणाले, “तरुणीला जबाबदार…” appeared first on Bharat Live News Media.

Go to Source