कोल्हापूर लोकसभा निवडणुकीतून चेतन नरके यांची माघार; कोणाला पाठिंबा देणार?

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. अनेक पक्षाने पाठिंबा दिला होता. परंतु, शेवटच्या क्षणी अपयश आले. अशी खंत व्यक्त करत गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ.चेतन नरके यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे आज (दि.१७) पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय … The post कोल्हापूर लोकसभा निवडणुकीतून चेतन नरके यांची माघार; कोणाला पाठिंबा देणार? appeared first on पुढारी.

कोल्हापूर लोकसभा निवडणुकीतून चेतन नरके यांची माघार; कोणाला पाठिंबा देणार?

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. अनेक पक्षाने पाठिंबा दिला होता. परंतु, शेवटच्या क्षणी अपयश आले. अशी खंत व्यक्त करत गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ.चेतन नरके यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे आज (दि.१७) पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे नरके यांनी स्पष्ट केले. Kolhapur Lok Sabha
पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढविल्यास तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचणे सोपे असते. त्यामुळे अपक्ष लढण्यापेक्षा निवडणुकीतून माघार घेत आहे. परंतु, कोल्हापूरच्या विकासासाठी पुढाकार घेणार आहे, असे नरके यांनी यावेळी सांगितले.
मला कोल्हापुरातच काम करायला आवडेल, असे सांगून तरुणांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी चेतन युवा सेतू संस्थेची स्थापना करणार आहे. त्याचबरोबर थायलंडसह आशिया खंडातील अनेक देशांसोबत साम्यंजस्य कराराच्या माध्यमातून कोल्हापुरातील फौंड्रीसह उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा 

Kolhapur Lok Sabha : लोकसभेबाबत ए. वाय. पाटील यांची भूमिका गुलदस्त्यात
Kolhapur Lok Sabha 2024 | हातकणंगले मतदारसंघ : तिकिट जाहीर झाल्यानंतर सत्यजित पाटील सरूडकर समर्थकांचा जल्लोष!
 Lok Sabha Election 1st Phase : पहिल्‍या टप्‍प्‍यातील प्रचार आज थंडावणार, जाणून घ्‍या ‘प्रमुख’ लढती

Latest Marathi News कोल्हापूर लोकसभा निवडणुकीतून चेतन नरके यांची माघार; कोणाला पाठिंबा देणार? Brought to You By : Bharat Live News Media.