
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : रोहित शेट्टीच्या सिंघम अगेन चित्रपटाची प्रतीक्षा सर्वांना लागून राहिली आहे. या चित्रपटाच्या शूटिंगच्या सेटवरून काही फोोटो व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये दीपिका पादुकोण दिसते. पोलिस अधिकारीच्या भूमिकेत ती दिसत आहे.(Singham Again ) दीपिकाचा लूक लेडी सिंघमप्रमाणे दिसत आहे. ती या चित्रपटात शक्ती शेट्टी ही भूमिका साकारेल, असे म्हटले जात आहे. काही फोटोमध्ये दीपिकाच्या डोळ्यावर गॉगल दिसत आहे. बाजूला रोहित शेट्टी उभारलेला दिसत आहे. टीमसोबत ती फायटिंग सीन्सची चर्चा, ॲक्शन करताना दिसत आहे. हे फोटो एक्सवर व्हायरल झाले आहेत. (Singham Again)
दीपिका पादुकोणने काही दिवसांपूर्वी तिने तिच्या इन्स्टाग्रामवर प्रेग्नेंसीची माहिती सार्वजनिक केली होती. आता प्रेग्नेंसीमध्येही ती काम करताना दिसतेय. सेटवर पोलिस वर्दीमध्ये ती दिसतेय. चित्रपटामध्ये ती ॲक्शन सीन करताना दिसेल. तिच्या चारी बाजूंनी कलाकार गुंडांच्या वेशभूषेमध्ये आहे. यावरून अंदाज लावू शकतो की, ती एक एक्शन सीन करत आहे. शूटच्या दरम्यान तिचा बेबी बंप देखील दिसत आहे. हे फोटो दीपिका पादुकोणच्या एका फॅन पेजवरून शेअर करण्यात आले आहेत.
Latest Marathi News ‘लेडी सिंघम’ दीपिका पादुकोणचे सेटवरून फोटो व्हायरल Brought to You By : Bharat Live News Media.
