व्हॅन देवनदी दरीत कोसळून तीन जणांचा मृत्यू

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागात पिंपळखुटा उमरपाडा ते गमन रोडवर भरधाव वेगात धावणारे पिकअप व्हॅन देवनदी दरीत कोसळून तीन जण मरण पावले. यात चालक केलास सुरेश पाटील (वय ३८ रा. ध्रुवनगर ता.जि. नाशिक) यांचा समावेश आहे. पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पिंपळखुटा उमरपाडा ते गमन रोडवर रविवार, दि. १४ एप्रिल रोजी रात्री १० … The post व्हॅन देवनदी दरीत कोसळून तीन जणांचा मृत्यू appeared first on पुढारी.

व्हॅन देवनदी दरीत कोसळून तीन जणांचा मृत्यू

नंदुरबार : Bharat Live News Media वृत्तसेवा
अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागात पिंपळखुटा उमरपाडा ते गमन रोडवर भरधाव वेगात धावणारे पिकअप व्हॅन देवनदी दरीत कोसळून तीन जण मरण पावले. यात चालक केलास सुरेश पाटील (वय ३८ रा. ध्रुवनगर ता.जि. नाशिक) यांचा समावेश आहे.
पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पिंपळखुटा उमरपाडा ते गमन रोडवर रविवार, दि. १४ एप्रिल रोजी रात्री १० वा. चालकाच्या ताब्यातील पिकअप वाहन क्र. MH- १८ AA ४७३३ हे भरघाव वेगाने घेवून जात असतांना वाहन अचानक उलटले आणि प्रवाशांसह देवनदी दरीत कोसळले. यातील राजू ओंकार बारेला (वय ३० वर्ष रा. कर्जाना ता. चोपडा जि. जळगाव), पोपट दत्तू ससाणे (वय- ४० वर्ष रा. नाशिक) दुखापती झाला तर ज्ञानेश्वर उत्तम वाघ (रा. कुंजर ता. चाळीसगाव जि. जळगाव), सुनिल बड्या पावरा (वय- २० वर्ष रा. खर्डीखुर्दचा पाटीलपाडा ता. धडगाव जि. नंदुरबार) आणि कैलास सुरेश पाटील (चालक) (वय- ३८ वर्ष रा. ध्रुवनगर ता. जि. नाशिक) या तिघांचा मृत्यू झाला. या विषयी मोलगी पोलीस ठाण्यात उशीरा गुन्हा नोंद करण्यात आला.
हेही वाचा:

Jailer Movie : साऊथच्या ‘जेलर’ चित्रपटाचा मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर
Lok Sabha Election 2024 : नकारात्मक प्रचारावर विरोधकांचा भर
आता लढायचं आणि जिंकायचं! शांतिगिरी महाराजांची अनुष्ठान समाप्ती; अपक्ष लढण्याची तयारी

Latest Marathi News व्हॅन देवनदी दरीत कोसळून तीन जणांचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.