साऊथच्या ‘जेलर’ चित्रपटाचा मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : गुन्हेगाराला सुधारण्याची संधी मिळाली तर गुन्हेगाराच्या आयुष्यात काय बदल घडून येऊ शकतो, या विषयावर आधारीत ‘जेलर’ चित्रपट आता मराठी ओटीटीवर पाहता येणार आहे. (Jailer Movie ) ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर १९ एप्रिल २०२४ रोजी वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. (Jailer Movie )
जेलर शांताराम याने सरकारला एक प्रस्ताव सादर केला आहे. ज्यात तो पाच गुन्हेगारांची निवड करेल. त्यांना एका ओसाड ठिकाणी घेऊन जाईल आणि त्या ओसाड जमिनीला हिरव्यागार शेतीत रूपांतर करून गुन्हेगारांना एका नव्या आयुष्याची सुरुवात करून देईल. सरकार हा प्रस्ताव मंजूर करते, परंतु जर गुन्हेगारांनी कोणताही गुन्हा केला तर शांतारामला आपली नोकरी सोडून तुरुंगात जावं लागेल, अशी अट घालते. जेलर शांतरामचा गुन्हेगारांना सुधारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का, हे चित्रपटात पहायला मिळणार आहे.
Latest Marathi News साऊथच्या ‘जेलर’ चित्रपटाचा मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर Brought to You By : Bharat Live News Media.