निवडणुकीतील गुलालाचा ट्रेंड बदलला; हार-तुऱ्यांचा मान वाढला
नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा
कधी काळी निवडणुकीत गुलालाचा ट्रेंड होता. आता बदलत्या काळानुसार फुलांचे हार-तुरे यांचा मान वाढला आहे. त्यामुळे फुलांच्या शेतीला चांगला भाव आला आहे. निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसा फुलांच्या हारांच्या मागणीत वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निफाड, जानोरी, मखमलाबाद येथील फूलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडे फूल व्यावसायिकांनी आताच मागणी नोंदवली आहे.
निवडणूक असो उत्सव असो किंवा आणखी कोणा नेत्याची सभा सध्या क्रेनचा वापर करत फुलांचा मोठा हार, जेसीबीला लावून तयार करण्यात आलेला स्वागत हार तसेच कोणा नेत्यासाठी तयार करण्यात आलेला लंबा हार असे हारांचे नवे प्रकार उदयास आले आहेत. तसेच फुलांच्या पाकळ्यांनादेखील मागणी मोठ्या प्रमाणात आहे. जेसीबी, क्रेनमधून फुलांची उधळण करण्यात येत असते. त्यासाठी पाकळ्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
शहरातील फूल व्यावसायिकांनादेखील निवडणुकांमुळे सुगीचे दिवस आले आहेत. फूल व्यावसायिकांनी इव्हेंटच्या माध्यमातून आता राजकीय पक्षांच्या चिन्हांचे, पक्षाच्या झेंड्याच्या थीमचे हार करायला सुरुवात केली आहे. त्याचप्रकारे महापुरुषांच्या जयंतीनिमित्त रंगसंगतीचे व्यवस्थापन करून हार करण्यात येत असतात. त्याच्यासाठी आगाऊ नोंदणी सुरू झाली आहे.
असे आहेत दर
गुलाबाच्या पाकळ्या ८०० रुपये क्रेट
झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या ५०० रुपये क्रेट
जेसीबीसाठी हार २० हजार रुपयांपासून पुढे
सध्या निवडणुकींमुळे फुलांच्या हारांची मागणी वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक फूलशेतीधारकांकडे आगाऊ नोंदणी होत आहे. मुंबई, ठाण्यातदेखील फुलांना मागणी आहे. हारांचे विविध प्रकार तयार झाले आहेत. त्यानुसार आता डिझाईन तयार होत आहेत. – रवींद्र खैरे, फूल व्यावसायिक.
हेही वाचा:
रक्षकच बनला भक्षक! पोलिस उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा
हिंगोली : बोल्डा फाटा येथे दुकानांना आग; १० दुकाने आगीच्या भक्षस्थानी
WhatsApp Chat Filter Feature : व्हॉट्सॲपचा नवा चॅट फिल्टर लॉन्च; आता एकही मॅसेज चुकणार नाही!
Latest Marathi News निवडणुकीतील गुलालाचा ट्रेंड बदलला; हार-तुऱ्यांचा मान वाढला Brought to You By : Bharat Live News Media.